SBI मध्ये प्रथमच ‘या’ पदाची भरती; पगार तब्बल १ कोटी‌ रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाची ओळख आहे. या बँकेने सध्या एका मोठ्या पदासाठी भरती करण्याची घोषणा केली आहे. मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) असं हे पद असून SBIकडून नमूद केल्याप्रमाणे, या पदासाठी वार्षिक पगार १ कोटी दिला जाणार आहे. सहाजिकच पगाराप्रमाणे जबाबदारी देखील फार मोठी असणार आहे. महत्त्वाची गोष्टी ज्या व्यक्तींना १५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव फक्त तिच व्यक्ती या पदासाठी अर्ज भरू शकते. एसबीआय एवढ्या मोठ्या पदासाठी पहिल्यांदा बाहेरच्या उमेदवाराला नियुक्त करत आहे. सध्या बँकेचे सीएफओ हे सी व्यंकट नागेश्वर आहेत जे उप-व्यवस्थापकीय संचालक आहेत.

SBI, CFO पदासाठी लागणारी पात्रता आणि अनुभव
मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) पदासाठी एसबीआयने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदावर करारानुसार नियुक्ती करण्यात येणार आहे. शिवाय पदासाठी वार्षिक पगार १ कोटी दिला जाणार आहे. CFO पदावरील अधिकाऱ्याचा पगार अध्यक्षाच्या पगारापेक्षा देखील अधिक असतो. करारात नमुद केलेल्या सूचनेनुसार या महत्त्वाच्या पदाचा कालावधी ३ वर्षांचा असणार आहे. सूचनेनुसार १ एप्रिल २०२० पर्यंत उमेदवाराकडे १५ वर्षांचा अनुभव असण्याची गरज आहे. शिवाय उमेदवाराकडे बँक किंवा मोठ्या कंपन्या, सार्वजनिक उपक्रम, आर्थिक संस्थामध्ये काम केल्याचा अनुभव असने बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे ५ वर्ष वरिष्ठ पदावर काम करण्याचा देखील अनुभव असायला हवा.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in