SBI Recruitment 2024 | अनेकांचे बँकेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न असते. बँकेतील नोकरी अनेकांना सुरक्षित देखील वाटते. जर तुम्हाला देखील बँकेत नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे आता ह्यूमन कॅपिटल मॅनेजमेंट यांच्याकडून तरुणांकरता नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मधील रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया (SBI Recruitment 2024)मधील ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट अंतर्गत अप्रेंटिसशिप पदासाठी इच्छुकांनी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. आता या भरतीसाठी काय काय लागते कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे याची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. या भरतीतर्गत तब्बल 3000 जागा भरण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ६ मार्च 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही अर्ज भरा.
महत्त्वाची माहिती ( SBI Recruitment 2024)
- पदाचे नाव – अप्रेंटिस शीप
- रिक्त जागा – 3000
- शैक्षणिक पात्रता – मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून पदवीधर
- नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- वयोमर्यादा – किमान 20 वर्ष एसी आणि एसटी कॅटेगरीतील उमेदवारांना 5 वर्षाची सूट.
- मासिक पगार – 15 हजार रुपये
- अर्ज शुल्क
- पीडब्ल्यू एस उमेदवारांना 400 रुपये
- एससी, एसटी, इडब्ल्यूएस महिला उमेदवारांसाठी 600 रुपये.
- उर्वरित उमेदवारांना 800 रुपये
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मार्च 2024
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.