हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (SBI Scheme) स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही संपूर्ण देशातील सार्वजनिक क्षेत्रामध्ये सर्वात मोठी आणि सर्वात जुनी बँक आहे. एसबीआयचे अनेक ग्राहक आहेत. ज्यांच्यासाठी एसबीआय कायम नवनवीन आणि उत्तमोत्तम योजना राबविताना दिसते. एसबीआय आपल्या ग्राहकांचा आनंद आणि फायदा दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून कायम आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम बचत योजना देण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे ही बँक अत्यंत लोकप्रिय बँकांपैकी एक आहे.
याशिवाय एसबीआय आपल्या ग्राहकांना ज्या योजना प्रदान करते त्या योजनांमध्ये चांगल्या परताव्यासह ग्राहकांना सुरक्षा देखील प्रदान केली जाते. (SBI Scheme) सध्या एसबीआयच्या माध्यमातून अशीच आणखी एक योजना आपल्या ग्राहकांसाठी राबविली जात आहे. ही एक वार्षिक ठेव योजना आहे. ज्यामध्ये मासिक उत्पन्न हप्त्यांवर (EMI) उत्पन्न मिळते. चला तर जाणून घेऊया SBI च्या वार्षिक ठेव योजनेबाबत सविस्तर माहिती.
SBI वार्षिक ठेव योजना (SBI Scheme)
एसबीआयच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या वार्षिक ठेव योजनेत एकदा पैसे जमा केल्यानंतर त्यावरील EMI चा लाभ ग्राहकांना घेता येतो. त्यामुळे या योजनेला ‘मासिक वार्षिकी हप्ता’ म्हणून देखील ओळखले जाते. या योजनेमध्ये जमा करण्याचा कालावधी ३ वर्ष, ५ वर्ष, ७ वर्ष किंवा १० वर्ष इतका उपलब्ध आहे. ज्यावर व्याजदेखील उपलब्ध आहे. म्हणून ही योजना ग्राहकांसाठी अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याची एक उत्तम संधी म्हणून सिद्ध होऊ शकते.
रिटर्नमध्ये सवलत
एसबीआयच्या या योजनेत ग्राहकांना एकत्र बँकेत पैसे जमा करावे लागतात. ज्यात बँकेकडून समान हप्त्यांमध्ये पैसे विभागले जातात. या हफ्त्यांमध्ये मूळ पैसे आणि व्याजाच्या काही भागाचा समावेश असतो. यात विभागलेले व्याज हे तिमाही दराने आकारले जाते आणि यामुळे दर महिन्याला रिटर्नमध्ये सवलत प्रदान केली जाते. (SBI Scheme)
योजनेचा कालावधी, गुंतवणूक आणि परतावा
SBI च्या वार्षिक ठेव योजनेचा लाभ तुम्ही भारतातील कोणत्याही शाखेतून घेऊ शकता. या योजनेच्या गुंतवणूकदारांना एकत्र पैसे जमा करावे लागतात. त्यानंतर त्यांना दरमहा पैसे मिळतात. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी ३६ महिने, ६० महिने, ८४ महिने किंवा १२० महिन्यांचा कालावधी निवडता येतो. (SBI Scheme) योजनेतील परताव्यात मूळ रक्कम आणि व्याज यांचा समावेश आहे. या योजनेत किमान गुंतवणूक १००० रुपये इतकी करावी लागते.
तर या योजनेतील कमाल ठेव रकमेवर कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. याशिवाय तुमच्या गैरहजेरीत एसबीआय ॲन्युइटी डिपॉझिट स्कीममधून परतावा मिळवण्यासाठी कोणीही नामनिर्देशित करू शकतो. यामुळे चिंतेचे कारण उरत नाही. महत्वाचे असे की, तुम्हाला गुंतवणुकीस पुढील महिन्याच्या १ तारखेला निश्चित परतावा प्रदान केला जातो. या योजनेत गुंतवणूकदारांना पासबुक मिळते. (SBI Scheme)