SBI ची ग्राहकांना चेतावणी! मोबाईलमध्ये ‘हे’ अ‍ॅप असेल तर खाली होऊ शकते संपुर्ण खाते

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून दिवसेंदिवस फसवणूकीचे प्रकार वाढतच आहेत. हे लक्षात घेता देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने (स्टेट बँक ऑफ इंडिया) ग्राहकांसाठी नुकताच अलर्ट जारी केला आहे. एका ट्विटद्वारे एसबीआयने लोकांना कोणतेही अनधिकृत मोबाईल अ‍ॅप वापरू नका असा सल्ला दिला आहे. एसबीआयने असे म्हटले आहे की, असे मोबाइल अ‍ॅप्स फसवणूक करणार्‍यांना आपल्या डिव्हाइसवर नियंत्रण ठेवण्याची परवानगी तसेच आपले कॉन्टॅक्ट, पासवर्ड आणि फायनानशिअल अकाउंट्समध्ये प्रवेश करण्याची परवानगी देते.

 

एसबीआयचे ट्विट
बँकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, काही मोबाइल अ‍ॅप्लिकेशन हे आपल्या संवेदनशील माहितीमध्ये फेरफार करून आपली वैयक्तिक माहिती उघड करू शकतात. एसबीआय तुम्हाला अशा अ‍ॅप्लिकेशनच्या वापराशी संबंधित काही महत्वाची माहिती सांगत आहे. या ट्विटच्या कॅप्शनसह एक छायाचित्र पोस्ट केले गेले आहे, ज्यामध्ये ग्राहकांच्या सुरक्षेसाठी अनेक टिप्स देण्यात आलेल्या आहेत.

एसबीआयने दिलेल्या टिप्स खालीलप्रमाणे
>> ग्राहकांनी नेहमीच वेरिफाइड अ‍ॅप डाउनलोड करावे, असे एसबीआयने म्हटले आहे.
>> कोणतेही अ‍ॅप इंस्टॉल करण्यापूर्वी ते वेरिफाइड आहे की नाही तसेच ते कोणत्या कंपनीने बनवले आहे हे तपासा?
>> कोणत्याही नवीन अ‍ॅपला परमिशन देताना काळजी घ्या. अ‍ॅप विचारत असलेली परमिशन महत्त्वाची आहे हे का याच्यावर लक्ष ठेवा?

>> कोणत्याही अ‍ॅपमध्ये डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या डीटेल्स सेव्ह करू नका.
>> आपला स्मार्टफोन नियमितपणे अपडेट करत रहा.
>> विनामूल्य स्क्रीनसेव्हर घेणे टाळा, कारण अशा अ‍ॅप्समध्ये इनबिल्ट रिस्क लपवलेली असू शकते.
>> फॉरवर्ड मेसेज मध्ये आलेल्या कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.cred

 

Leave a Comment