हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) कडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीअंतर्गत व्यवस्थापक, FLC समुपदेशक आणि FLC संचालक या पदांसाठी एकूण 273 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी 26 मार्च 2025 या तारखेच्या आत आपले अर्ज अधिकृत वेबसाईटवर जमा करावेत.
भरतीसाठी उपलब्ध पदे आणि जागा
SBI द्वारे जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण 273 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये FLC समुपदेशकची 263 पदे, FLC संचालकची 6 पदे, व्यवस्थापकची 4 पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक (रिटेल उत्पादने) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA, PGDM, PGPM किंवा MMS पदवी आवश्यक आहे.
FLC समुपदेशक आणि FLC संचालक – या पदांसाठी सेवानिवृत्त बँक अधिकारी अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा
- अर्ज करण्यासाठी किमान वय 28 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे असावे.
- सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
निवड प्रक्रिया
- SBI मध्ये उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.
- मुलाखतीत मिळालेल्या गुणांवरून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
पगार किती मिळेल?
- व्यवस्थापक (रिटेल उत्पादने) – 1,05,280 प्रति महिना
- FLC समुपदेशक: 50,000 प्रति महिना
- FLC संचालक: 75,000 प्रति महिना
अर्ज करण्याची प्रक्रिया
- SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट द्या
- नवीन नोंदणी लिंकवर क्लिक करा आणि आवश्यक माहिती भरा
- अर्ज करण्यासाठी लॉगिन करा आणि आवश्यक माहिती प्रविष्ट करा
- पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- अर्ज फी भरा (जर लागू असेल) आणि सबमिट करा
- अर्जाची प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवा
अर्ज करण्याची अंतिम तारीख
SBI मध्ये या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 मार्च 2025 आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज भरावेत. तसेच भरती संदर्भातील सविस्तर माहिती SBI च्या अधिकृत वेबसाईटवर पहावी.