मोठी बातमी!! NEET परीक्षेच्या घोळाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने NTA ला बजावली नोटीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नीट परीक्षेच्या घोळासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. नीट परीक्षेच्या वाढीव निकालाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ला नोटीस बजावली आहे. या नोटीसीमध्ये एनटीएने लवकरात लवकर उत्तर दाखल करावे असे न्यायालयाने म्हटले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी थेट 8 जुलै रोजी होणार आहे. या सुनावणीपर्यंत NTA ला नीट परीक्षेच्या वाढीव गुणांबाबत उत्तर द्यावे लागणार आहे.

नीट परीक्षेतील गुणांच्या घोळाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती याची केवळ आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये न्यायालयाने स्पष्ट सांगितले की, झालेल्या प्रकारामुळे नीट परीक्षेच्या पावित्र्याला धक्का बसला आहे. त्यामुळे एनटीएकडून उत्तर हवे आहे. आजच्या सुनावणीत न्यायालयाने समुपदेशन प्रक्रियेला स्थगिती देण्यास ही नकार दिला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी एनटीएचे उत्तर आल्यानंतर 8 रोजी होईल.

दरम्यान, नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणावरून उमेदवारांच्या एका गटाने NEET-UG 2024 परीक्षा नव्याने आयोजित यावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिकेत NEET UG 2024 चा निकाल मागे घेऊन परीक्षा पुन्हा घेण्यात यावी असे म्हणले आहे. याच याचिकेवर आज न्यायालयाची सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये न्यायालयाने परीक्षा रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली आहे. यासह समुपदेशन देखील रद्द केले जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे.