Wednesday, June 7, 2023

सर्व राज्यांनी दारू विक्रीसाठी ‘होम डिलिव्हरी’ चा विचार करावा – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली | सर्व राज्यांनी सोशल डिस्टसिंगचे नियम पाळत कोणताही संपर्क न वाढवता दारूची ‘होम डिलिव्हरी’ करण्याचा विचार करावा,” अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने आज सर्व राज्यांना केल्या आहेत. सरकारने लॉकडाउनच्या निर्णयाला मुदतवाढ दिली. तसेच दारू विक्रीला परवानगी दिली. मात्र, दारुविक्रीच्या आदेशात स्पष्टता नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. त्यात या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार अनेक राज्यांनी दारुविक्रीला परवानगी दिली. आणि सर्व ठिकाणी दारूची दुकाने सुरू झाली. दारूची दुकाने सुरू झाल्याने तळीराम खुश झाले खरे पण कोणत्याही प्रकारचा सोशल डिस्टन्स ते पाळताना दिसत नाहीत. त्यामुळे कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने वरील सूचना दिल्या आहेत.

3 मे नंतर लॉकडाउन वाढवताना केंद्र सरकारने काही बाबतीत शिथिलता दिली. त्यामुळे अनेक राज्यांनी जीवनावश्य असलेल्या व जीवनावश्यक नसलेल्या वस्तुंची दुकानं खुली करण्यास परवानगी दिली होती. गेल्या 2 महिण्यापासून दारूची दुकाने बंद होती. त्यामुळं सरकारचा मोठा महसूल बुडाला आहे. या गोष्टीचा विचार करून अनेक राज्यांनी दारू विक्रीला सुरुवात केली. मात्र लोक दारू खरेदीसाठी मोठी गर्दी करत असल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे न्यायालयाने दारूची होम डिलिव्हरी करण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”