शाळा, कॉलेज उघडण्याबाबत गृह मंत्रालय म्हणते..

नवी दिल्ली । देशात कोरोना साथीचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात लॉकडाऊनची घोषणा केली. हा लॉकडाऊन वाढत जाऊन चौथ्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. दरम्यान चौथ्या टप्प्याच्या लॉकडाऊनमध्ये सरकारने शहरांमधील रुग्णांची संख्या लक्षात घेत नियमांमध्ये शिथिलता देखील दिली आहे. त्याचप्रमाणे यंदाच्या शैक्षणिक सत्रातील शाळा आणि कॉलेज उघडणार का? याबाबत गृह मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे. शैक्षणिक सत्रातील शाळा आणि कॉलेज उघडण्यासंबंधी अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले आहे.

या आणीबाणीच्या काळात शाळा आणि कॉलेजांवरील बंदी कायम आसल्याचं समोर आलं आहे. दरम्यान मंत्रालयाने शाळा आणि कॉलेज उघडण्यास परवानगी दिली आहे अशी चर्चा रंगत होती. त्यामुळे गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी तुर्तास परिस्थिती पाहता यंदाच्या शैक्षणिक सत्रातील शाळा आणि कॉलेज उघडणार नसल्याचे स्पष्ट केले.

‘केंद्रीय गृहमंत्रालयाने अद्याप असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. देशात सर्व शैक्षणिक संस्थानांवर घालण्यात आलेली बंदी कायम आहे.’ अशा आशयाचं ट्विट गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केलं आहे. कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी मार्च महिन्यापासून सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत. सांगायचं झालं तर, देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात रुग्णांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रा पाठोपाठ गुजरात आणि तामिळनाडूमध्ये रुण्यांच्या संख्येत वाढ होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”