Wednesday, October 5, 2022

Buy now

शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड उद्या परभणी जिल्हा दौर्‍यावर

परभणी : हॅलो महाराष्ट्र – राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड या परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 12 मार्च 2022 रोजी नांदेड येथून शासकीय विश्रामगृह परभणी येथे सकाळी 11.30 ते 2.45 वाजेपर्यंत आगमन व राखीव. दुपारी 2.45 वाजता शासकीय विश्रामगृह परभणी येथून मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय परभणीकडे प्रयाण. दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार.

सायंकाळी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून मोटारीने अक्षदा मंगल कार्यालयाकडे प्रयाण, सायंकाळी 4.10 ते 6 वाजेपर्यंत व्हियतनाम येथील पंचधातूच्या 355 तथागत गौतम बुध्द मुर्ती वितरण सोहळ्यास उपस्थिती (स्थळ : अक्षदा मंगल कार्यालय, परभणी), सायंकाळी 6 ते 6.30 वाजेपर्यंत परभणी जिल्हा काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक (स्थळ : बी.रघुनाथ सभागृह परभणी) होणार.

सायंकाळी 6.30 ते 7.15 वाजेपर्यंत परभणी विधानसभा काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व परभणी विधानसभा मतदार संघातील महिला बचत गटांना मोफत शिलाई मशिन वाटप कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : कल्याण मंडपम परभणी), सायंकाळी 7.15 वाजता कल्याण मंडपम येथून मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व राखीव. रात्री 8 वाजता शासकीय विश्रामगृह परभणी येथून मोटारीने रेल्वेस्थानकाकडे प्रयाण, रात्री 8.20 वाजता परभणी येथून देवगिरी एक्सप्रेस रेल्वेने मुंबईकडे प्रयाण करतील.