बुलडाणा प्रतिनिधी । दरवर्षी ८ मार्चला महिला दिनाच्या निमित्ताने देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यानुसार आतापासून महिला दिन साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे दरम्यान, बुलडाणा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सुमन रावत चंद्र यांच्या ट्विटवरील एका ट्विटला पोस्टला सोशल मीडियावर बरीच पसंती मिळत आहे. जिल्हाधिकारी सुमन रावत चंद्र यांनी आपल्या ट्विटमध्ये एक छायाचित्र शेअर केलं ज्यात एक शालेय विद्यार्थीनी त्यांच्या खुर्चीवर बसलेली दिसत आहे.
हे छायाचित्र शेअर करताना त्यांनी लिहिले की, “आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने विविध शाळांमधील काही हुशार विद्यार्थिनींना एक दिवसासाठी जिल्हाधिकारी होण्याची संधी दिली जात आहे. तेव्हा जिल्ह्याची आजची जिल्हाधिकारी जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी पूनम देशमुख आहे. याच ट्विटला रिप्लाय करत त्यांनी पुढं लिहाल आहे,”कलेक्टर बनून ती आज आपले काम खूप चांगल्या प्रकारे करत आहे. तिला खात्री आहे की एक दिवस ती नक्कीच यशस्वी होईल आणि तिने वचन दिले आहे की ती कठोर परिश्रम करेल आणि इतर मुलींनाही प्रेरित करेल.”
#CollectorForADay #IWD2020
To a run up the International Womens Day, for a week few of the bright girls vl be given n opportunity to be Collector for a day. Today’s Collector Zilla Parishad School’s bright star Poonam Deshmukh.@NITIAayog @CMOMaharashtra pic.twitter.com/GtXgALX9gO— Suman Rawat Chandra (@oiseaulibre3) March 2, 2020
महिलांना प्रेरित करण्याच्या दृष्टीनं जिल्हाधिकारी सुमन रावत चंद्र यांनी घेतलेल्या पुढाकाराचे ट्विटरवर कौतुक होत आहे. तर जिल्ह्यातील विद्यार्थिनींचे अधिकारी होण्याचे स्वप्न जिल्हाधिकारी सुमन रावत चंद्र यांच्या स्तुत्य उपक्रमामुळं पूर्ण होत असल्यानं जिल्ह्यातील मुलींना एक नवीन प्रेरणा मिळत असल्याची प्रतिक्रिया जिल्ह्यातील शिक्षकांकडून मिळत आहे.
#CollectorForADay Poonam Deshmukh smartly conducting her work as a Collector today. She is confident and inspired to be successful one day and took a pledge to work hard for same and also inspire other girls @unwomenindia @DrRPNishank @MinistryWCD @smritiirani pic.twitter.com/4m2APcn9Om
— Suman Rawat Chandra (@oiseaulibre3) March 2, 2020
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.