औरंगाबाद : कोरोना महामारीमुळे मागील वर्षापासून शाळा महाविद्यालय बंद आहेत. यातच आता 15 जून पासून शाळा सुरु होत आहेत. परंतु शाळेत फक्त शिक्षक आणि कर्मचारी असणार आहेत. विद्यार्थ्यांना घरी बसूनच ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, सोमवारी 14 जून रोजी शिक्षकांच्या हजेरी बाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार असून पत्र सुद्धा देण्यात येणार आहे. विद्यार्थी जरी शाळेत येणार नसेल तरी शिक्षकांना शाळेत यावे लागणार आहे.
शाळेचे कोरोना पासून बचाव करण्यासाठी निर्जंतुकीकरण करणे, स्वछता राखणे, हॅन्ड सॅनिटायझरचा वापर करणे, तोंडाला मास्क लावणे हे सर्व नियम पाळून माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अनुदानित आणि विनाअनुदानित, शासकीय, जिल्हा परिषद, खाजगी त्याचबरोबर 4 हजार 555 शाळांना सुरुवात होणार आहे. विद्यार्थी शाळेत येणार नसले तरीही शाळेत नवीन प्रवेश देणे उत्तीर्ण विद्यार्थ्यांना टीसी देणे आधार अपडेट करणे हे कामे सुरु राहणार आहेत.