औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यातील शाळा बंद आहे. पण ऑनलाईन पद्धतीने कलासेस सुरु असले तरीही विद्यार्थ्यांना शाळेची ओढ अजूनही लागलेली आहे. आता लवकरच कोरोना मुक्त गावांमध्ये शाळा सुरू होणार आहे. यामध्ये इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी सरकारकडून मार्गदर्शक सूचना मागविण्यात आल्या आहेत. या संदर्भातील निर्णय शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने सोमवारी जाहीर केला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनामुक्त असलेल्या 901 गावांमधील 1368 पैकी 919 शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. पालकांची आपल्या पाल्याला शाळेत पाठवन्याची परवानगी असेल तर शाळा सुरु करावी असे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. याबाबत ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठराव घ्यावा असेही त्यांनी सांगितले.
औरंगाबाद तालुक्यातील आणि गंगापूर येथील 7 गावे, कन्नड मधील 173, खुलताबाद 43,पैठण 144, फुलंब्री 73, सिल्लोड 121, सोयगाव 79, वैजापूर 127 आदी गावे कोरोनामुक्त आहेत. कोरोना महामारीमुळे होणारा मानसिक त्रास, इंटरनेट चा गैरवापर, बालमजूरांचे वाढीव प्रमाण बालविवाह हे सर्व प्रकार लक्षात आल्याने विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचा लाभ व्हावा. यासाठी कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्याबाबत शासन विचाराधीन आहे. यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना मागितल्या आहेत.