शाळकरी मुलीची राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या

कराड | मुंढे (ता. कराड) येथील एका शाळकरी मुलीने राहत्या घरी साडीच्या सहाय्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. रविवारी ११ एप्रिल रोजी पहाटे ३ च्या सुमारास घटनेची माहिती मिळाली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मुंढे येथील अनघा कैलास साळवे (वय- 13) या शाळकरी मुलीने  किचनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. रात्रीच्या सुमारास घरात घडलेल्या घटनेचे कारण मात्र अद्याप पोलिसांना समजू शकलेले नाही. अनघा ही यशवंत हायस्कूलची विद्यार्थीनी होती. ती आठवी इयत्तेत शिकत होती.

सदरच्या घटनेची खबर गजानन पवार यांनी दिलेली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार सुभाष फडतरे करीत आहेत.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like