पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही जिल्ह्यात शाळा सुरूच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालकममंत्री जयंत पाटील यांच्या आदेशाने जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ऑनलाईन शिक्षणास पालकांचा विरोध होत आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांची संमती घेऊन शाळेत अद्यापन सुरू ठेवण्यात यावे, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती आशा पाटील यांनी दिल्या आहेत. त्यामुळे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या आदेशाला शिक्षण सभापतींकडून वाटयाण्याच्या अक्षता दिल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचा आदेश पालकमंत्री जयंत पाटील आणि जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

गेल्या दोन वर्षापासून सुरु असणार्‍या कोरोनाच्या संकटाने मुलांचे शैक्षणिक मोठे नुकसान झाले आहे. चार महिन्यांपूर्वी ऑनलाईन शिक्षण बंद होऊन ऑफलाईन अध्यापन सुरु झाले होते. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पुन्हा ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने आदेश दिले आहेत. मात्र ऑनलाईन शिक्षणास पालकांनी विरोध केला आहे. ग्रामीण भागात बहुसंख्य गावात मंगळवारीही शाळा सुरु होत्या. सभापती पाटील म्हणाल्या, ऑनलाईन शिक्षणास पालक तयार नाहीत. आक्रमणे तशी प्रतिक्रिया ते व्यक्त करीत आहेत. त्यामुळे पूर्ण शाळा बंदला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेत शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती असणार आहे.

काही ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी आहे तिथे शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांची संमती घेऊन शाळेत शिक्षण सुरू ठेवण्यात येणार आहे. शाळेत मुलांना टप्प्याटप्प्याने बोलवण्यात येणार आहे. तसेच ज्या गावात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढेल तिथे ऑफलाईन शिक्षण बंद करून ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्यात येतील. एकीकडे कोरोनाची तिसरी लाट वाढत चालली असताना शिक्षण सभापतींनी शाळा व्यवस्थापन समितीने स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे पालकमंत्री जयंत पाटील आणि जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला त्यांच्याकडून वाट्याण्याच्या अक्षता देण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

Leave a Comment