हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत तुमच्या कानावर पडत असेलच. AI टूल्सवर सतत काम केले जात आहे आणि अनेक नवीन गोष्टी शोधल्या जात आहेत. शिक्षणापासून ते अन्य अनेक क्षेत्रांमध्ये AI चा वापर झपाट्याने वाढत आहे. आता यामध्ये एक पाऊल अजून पुढे पडलं असून आता तर दुसऱ्याच्या मनात काय चाललं आहे आणि तुम्ही आटा काय विचार करत आहात हे सुद्धा AI च्या माध्यमातून लगेच समजणार आहे.
टेक्सास विद्यापीठातील काही शास्त्रज्ञांनी एआय टूल तयार केले आहे जे फंक्शनल मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग (एफ-एमआरआय) स्कॅनद्वारे लोकांच्या मनात नेमकं काय चाललं आहे. सद्यस्थितीत काय विचार मनात आहे ते वाचू शकते आणि लिहून देऊन शकते. या सिस्टिमला Semantic Decoder असं म्हंटल जाते. शास्त्रज्ञांनी फंक्शनल मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग (एफ-एमआरआय) स्कॅन वापरून तीन वेगवेगळ्या लोकांच्या मेंदूच्या ऍक्टिव्हिटी16 तास रेकॉर्ड केल्या. आणि त्यानंतर त्यांच्या मनात काय चाललं आहे ते डीकोड करण्यासाठी शास्त्रज्ञानी चॅट जीपीटी सारखे उपकरण तयार केले आणि त्याच्या मदतीने सर्वकाही डीकोड केले. या एआय मॉडेलच्या मदतीने अचूक परिणाम समोर आला नसला तरी, हे लोक काय विचार करत आहेत हे एक ब्लू प्रिंट शास्त्रज्ञाला मिळाले.
शास्त्रज्ञांना आशा आहे की हे तंत्रज्ञान अपंग व्यक्तींसाठी आणि पैरालिसिस झालेल्या लोकांसाठी एक वरदान ठरेल. हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात AI आधारित डीकोडर आहे, ज्याच्या माध्यमातून पुढच्या व्यक्तीच्या मनात काय चालल आहे हे आपण जाणू शकतो. या हैराण करणाऱ्या संशोधनामुळे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जग किती पुढं गेलं आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो.