हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अश्मयुगापासून मानवाच्या उत्क्रांतीमध्ये खूप जास्त बदल झालेला आहे. आणि आता एक आधुनिक माणूस विकसित झालेला आहे. माणसाची उत्पत्ती ही माकडापासून झाली. आपण शाळेत असताना देखील शिकलेलो आहे की, माणसाचा जन्म एका माकडापासून झालेला आहे. त्यामुळे सुरुवातीला माणसाच्या अंगावर खूप केस होते. तसेच शेपूट देखील होते. परंतु या गोष्टीचा वापर जास्त होत नसल्याने हळूहळू अंगावरील अतिरिक्त केस आधी माणसाचे शेपूट देखील गळून पडले. आणि एक आधुनिक माणूस तयार व्हायला लागला. याबद्दल डार्विनचा एक सिद्धांत देखील आहे आणि त्यांच्या सिद्धांतानुसार मानवाच्या उत्क्रांतीची ही प्रक्रिया अजूनही चालूच आहे.
या आधुनिक मानवामध्ये ही अनेक वेगवेगळे शारीरिक बदल होताना दिसत आहे. यामध्ये लोकांची आहार शैली त्यांच्या दातांची रचना यांसारख्या गोष्टी वेगवेगळ्या होत आहेत. तसेच संशोधकांनी आता एक असे म्हणणे मांडलेले आहे की, भविष्यात जाऊन मानवाच्या उत्क्रांतीमध्ये मानवाला चोच देखील येऊ शकते. वयस्कर लोकांची वाढती लोकसंख्या तसेच इतर काही कारणांमुळे भविष्यात जाऊन मानवाला चोच येण्याची शक्यता आहे. असा देखील दावा करण्यात आलेला आहे. परंतु हा दावा काही नवीन नाही कारण चोच सिद्धांत हा पूर्वीपासूनच प्रचलित झालेला आहे.
या सिद्धांताबाबत सेल्फीड विद्यापीठातील संशोधकांनी उत्क्रांती सिद्धांत मांडलेला आहे. त्यांनी मांडलेल्या सिद्धांतानुसार या समस्येवर माप मात करण्याच्या हेतूने आपोआप काही बदल घडून येणार आहेत. असे देखील सांगण्यात आलेले आहे. कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या जीवनामध्ये केवळ दोन वेळेस दात येतात आणि त्या दातांच्या आयुष्य देखील आता कमी होत चाललेले आहे. लोकांच्या जेवणामध्ये बदल होत आहे. माणसांना दंतरोग वाढत आहे. परंतु जर हे दंतरोग टाळायचे असतील तर त्यांच्यासाठी चोच खूप सोयीस्कर असेल. लाखो वर्ष उत्क्रांती होऊन शेवटी चोच निर्माण होईल. असे देखील सांगण्यात आलेले आहे. याचा उपयोग करून ते
गोगल गाईंचे शंख आणि खेकडे देखील पडू शकतात दणकट असते.
याबाबत एका संशोधकांनी गमतीने म्हटले आहे की, आगामी पिढीमध्ये या टूथ फेअर सेल्स नेहमी दात तयार करत राहतील. आणि शार्क माशांमध्ये सतत दात पुन्हा पुन्हा येत राहतील. आणि ही क्षमता पुढे जाऊन माणसात देखील येऊ शकते. परंतु हे सगळे बदल लगेच घडणार नाही. त्यासाठी लाखो वर्ष जावे लागतील. परंतु आता हा संशोधनाचा दावा ऐकून सर्वसामान्य माणसे देखील चिंतेत पडलेली आहे की, जर पुढील आयुष्यात माणसांना दाताऐवजी चोच आली तर अनेक गोष्टी अवघड होतील याची सगळ्यांना भीती आहे.