शास्त्रज्ञांचा दावा – “कोरोनाच्या नऊ महिन्यांनंतरही शरीरात अँटीबॉडीज राहतात”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोनाचा एकदा संसर्ग झाल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज शरीरात किती दिवस राहतात या प्रश्नाचे शास्त्रज्ञांनी उत्तर दिले आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, संसर्ग झाल्यानंतर 9 महिन्यांपर्यंत शरीरात अँटीबॉडीज पातळी वर राहते. मग जरी संसर्गानंतर रुग्णामध्ये लक्षणे दिसून आली असेल किंवा रुग्ण एसिम्प्टोमॅटिक ठरला असेल. हा दावा इटलीतील पडुआ विद्यापीठ आणि लंडनमधील इम्पीरियल कॉलेज यांनी संयुक्तपणे केला आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये इटली शहरातील 3 हजार कोरोना बळींच्या डेटाचे विश्लेषण केले गेले. यापैकी 85 टक्के रुग्णांची तपासणी करण्यात आली. मे आणि नोव्हेंबर 2020 मध्ये पुन्हा एकदा रुग्णांमध्ये अँटीबॉडीजच्या पातळी तपासणी मध्ये दिसून आली. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये संसर्ग झालेल्यांपैकी नोव्हेंबरमध्ये 98.8 टक्के रुग्णांमध्ये अँटीबॉडीज आढळून आली होती.

इम्पेरिअल कॉलेजचे संशोधक इलेरिया डोरिगती म्हणतात,”या संशोधनादरम्यान असे आढळून आले की, अँटीबॉडीजची पातळी लक्षणे नसलेल्या आणि असलेल्या रूग्णांमध्येही एकसमान होती. यावरून हे देखील स्पष्ट झाले की, कोरोनाची लक्षणे आणि संसर्ग किती तीव्र होता, याचा अँटीबॉडीजच्या पातळीवर कोणताही परिणाम झाला नाही.

पदुआ विद्यापीठाचे संशोधक एनरिको लावेझो यांच्या म्हणण्यानुसार, शहरातील लोकसंख्येच्या 3.5 लोकांना या संशोधनात समाविष्ट केले गेले होते. यापैकी बहुतेक लक्षवेधी होते. संशोधनादरम्यान, हे उघड झाले की प्रत्येक 4 पैकी एका व्यक्तीने आपल्या कुटुंबात हा संसर्ग पसरविला.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment