पृथ्वीच्या भुगर्भातील ‘हा’ आकार पाहून शास्त्रज्ञही झाले आश्चर्यचकीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पृथ्वीच्या गाभ्याभोवती फिरणारे तप्त आणि दाट असे द्रवाचे गोळे अधिक व्यापक असल्याचे मागे एकदा संशोधनात समोर आले होते. आता भूंकपाचे विश्लेषण करणाच्या एका नव्या पद्धतीत पूर्वी सापडलेल्या खंडीय आकाराच्या भागापेक्षा देखील वेगळे असे काही पृथ्वीचा गाभा आणि आवरण यांच्या सीमेवर सापडले आहे. तो कदाचित मॅग्मा, वितळलेले लोखंड किंवा आणखी काहीतरी असू शकते. परंतु आपण आणखी तपशीलवर नकाशा घेऊनच पृथ्वीच्या आतमध्ये ते काय आहे आणि कोठे आहे हे शोधू शकतो असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मात्र भूगर्भातील हा आकार पाहून शास्त्रज्ञही अवाक झाले आहेत. पृथीच्या पृष्ठभागाच्या साधारण २९०० किमी आत या गाभ्याची सीमा आहे. म्हणूनच आतमध्ये काय सुरु हे शोधण्यासाठी आपल्याला सर्जनशील व्हावे लागेल असे त्यांचे म्हणणे आहे.

ज्याप्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे भूकंपाचे हादरे बसत आहेत. एकूणच परिस्थिती पाहता पृथ्वीच्या अंतर्भागातील नकाशा तयार करण्यास शास्त्रज्ञांना परवानगी मिळाली आहे. दशकापूर्वी गाभा आणि आवरण यांच्या सीमेवर अशाच प्रकारचे महाकाय गोळे दिसले होते. उष्णतेमुळे यांचे वितळण्याचे प्रमाण जास्त होते. हे भाग भूकंपाच्या लाटांची गती कमी करते. म्हणून याना अल्ट्रा लो झोन म्हणून देखील ओळखले जाते. भूकंपामुळे हे काय आहे याचा शोध लागणार असला तरी भूकंप येण्याची वाट पाहावी लागेल म्हणूनच मेरीलँड विद्यापीठ आणि जॉन हॉपकिन्स विद्यापीठ यांनी एका असामान्य स्रोताचा अर्थात ताऱ्यांचा वापर करायचे ठरविले आहे. ताऱ्यांचा अभ्यास करणारे एक अल्गोरिदम तयार करण्यात आले आहे ज्याला सिक्वेन्सर म्हणतात याद्वारे हे जे काही आहे त्याचा शोध लावला जाणार आहे.

blobs

सिक्वेन्सरमधील अहवालानुसार आशिया आणि ओशिनिया मधील भूकंपामुळे भूकंपाच्या वेव्हफॉर्ममध्ये होणारे सूक्ष्म बदल दिसून आले आहेत. ज्यामुळे दक्षिण पॅसिफिक मार्केसस बेटांच्या खाली पूर्वी आढळलेला अल्ट्रा लो वेग कमी झाल्याचे सूचित होते.  आता “मेरीक्झॅस बेटांच्या खाली इतकी मोठी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट सापडल्यामुळे आम्ही आश्चर्यचकित झालो आहोत. हे असे काही आहे ज्याची पूर्वी कल्पनाही नव्हती,” असे मेरीलँड युनिव्हर्सिटीचे भूगर्भशास्त्रज्ञ वेदरन लकी म्हणाले. आता हे नेमके काय आहे याचा शोध शास्त्रज्ञ घेत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment