बँकॉक वरून कोलकात्याला जाणाऱ्या विमानात प्रवाशांची हाणामारी, Video आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या सोशल मीडियावर थाई एअरवेजच्या बँकॉक-इंडिया विमानात झालेल्या भांडणाचा (fight) एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये दोन व्यक्तींमध्ये जोरदार हाणामारी (fight) झाल्याचे पाहायला मिळत आहे. हे भांडण शेवटी इतकं वाढत जातं की त्याचं रूपांतर शेवटी हाणामारीमध्ये (fight) होतं. बाकी प्रवासी हे भांडण बघत असल्याचे दिसत आहे. या विमानात फ्लाइट अटेंडंट म्हणून एक महिला असल्याने तीदेखील हे भांडण सोडवण्यासाठी असहाय्य असल्याचे दिसत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हिडिओमध्ये आधी दोन प्रवासी एकमेकांवर आरडाओरड करताना दिसतात. व्हिडीओ (fight) बघताना असं वाटतं की हे कदाचित विमानातील बसण्याचा जागेवरून भांडत असावेत. हे भांडण वाढत गेल्यानंतर त्यांच्यात चांगलीच मारामारी होते. व्हिडिओत एकजण म्हणत आहे शांत बसा तर दुसरा हात खाली करा असे म्हणतो आणि मग काही सेकंदातच या शाब्दिक भांडणाचे शारीरिक भांडणात (fight) रुपांतर होते आणि दुसऱ्याने आक्रमकपणे दुस-याला कानाखाली वाजवली. यानंतर काही अन्य प्रवासी देखील या हाणामारीत सहभागी होतात. या सगळ्यानंतर थाई स्माइल एअरवेजने याबाबत अजूनपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

नागरी उड्डाण मंत्रालयाशी संलग्न असलेल्या ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीने या व्हायरल व्हिडिओची (fight) दखल घेतली असून तपास सुरु असल्याचे म्हंटले आहे. संबंधित प्राधिकरणाकडून सविस्तर अहवाल मागविला आहे,” असे बीसीएएसचे महासंचालक झुल्फिक्वार हसन यांनी सांगितले आहे. सध्या हा हाणामारीचा (fight) व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या