डॉक्टर कडे न जाता करोनाव्हायरस मधून बऱ्या झालेल्या महिलेचा अनुभव! तिच्याच शब्दात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | “सर्वप्रथम सांगू इच्छिते कि किती सहजपणे हा होऊ शकतो, एका हाऊस पार्टी मध्ये मी गेलेले होते तिथे मला लागण झाली असं मला वाटतं , विशेष म्हणजे तिथे कोणीही खोकत नव्हतं ,शिंकत नव्हतं किंवा आजारी दिसत नव्हतं. पार्टी मध्ये सहभागी झालेले जवळपास ४०% लोक आजारी पडले. मीडिया मधून सांगत आहेत कि सतत हात धुणे आणि आजारी लोकांशी संपर्क टाळणे , मी तेच केलं. पण जोपर्यंत तुम्ही स्वतःला एकटं पाडत नाही तोपर्यंत हे अशक्य आहे, त्या पार्टी मधले ४०% लोक ३ दिवसातच COVID-19 ची लक्षणे दाखवू लागले जसे कि ताप आणि इतर.

दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना याची लक्षणे त्यांच्या वयानुसार, निरोगीपणानुसार दिसत होती. माझे सगळे आजारी पडलेले मित्र चाळीशी पन्नाशी चे आहेत तर मी पस्तिशी मध्ये आहे. आम्हाला सर्वप्रथम डोके दुखणे , मग ताप येणे (३ दिवस सलग ताप राहून मह ३ दिवस येत जात होता) . प्रचंड प्रमाणात अंगदुखी ,सांधेदुखी आणि अशक्तपणा असं होत गेलं. मला पहिल्या दिवशी १०३ ताप आला आणि नंतर १०० पर्यंत खालीही आला. काहीजणांना जुलाब होत होते . मलाही त्राण गेल्यासारखं वाटत होतं. ताप गेल्यावर घसा दुखणे , घश्याला इन्फेक्शन, छाती जड होणे,नाक चोंदणे, श्वास घ्यायला त्रास होणे असे प्रकार होत होते. हा सगळा त्रास आम्हाला १० ते १६ दिवसाच्या कालावधीत झाला. अडचण अशी होती कि प्रचंड खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होत असेल तरच COVID-19 साठी टेस्टिंग केली जात होती. मी माझे सॅम्पल सिएटल फ्लू स्टडी या संस्थेकडे तपासायला दिले , हि संस्था  COVID-19 फ्लू साठी लोकांकडून सॅम्पल गोळा करून त्याचा अभ्यास करत होती. त्यांनी माझं सॅम्पल पडताळणी साठी किंग कौंटी पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट कडे पाठवलं. मला नंतर कळवलं गेलं कि मी दिलेले सॅम्पल हे करोनाव्हायरस पॉसिटीव्ह निघाले. दोन्ही संस्थांनी हि पडताळणी केली.

९ मार्च रोजी सुमारे १३ दिवस झाले होते माझ्या करोनाव्हायरस च्या लक्षणांना सुरुवात होऊन. किंग कौंटी पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट च्या सल्ल्यानुसार मी लक्षणं दिसायला सुरुवात झाल्यापासून किंवा ताप आल्यानंतर पुढचे ७ दिवस एकटी राहायला हवं होतं. पण तसं झालं नाही . पण मी अवघड कामे करणे किंवा जास्त गर्दीत जाणे टाळत होते. मी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाले नाही, माझ्या केस मध्ये मी स्वतःहून च रिकव्हर होत होते , मला वाटत होतं कि हा पण एक फ्लू चा प्रकार आहे पण थोडासा वेगळा.पूर्वी मी इथल्या स्थानिक फ्लू ची लस  घेतलीही होती.

फारच कमी लोकांची टेस्टिंग झाल्याने आपल्याला फक्त सर्दी/ताप आला आहे असा समज असलेले लोक गर्दीत मिसळून आजार पसरवत आहेत आणि त्याच बरोबर कोणतीही लक्षणे दिसत नसलेली पण करोनाव्हायरस आजार झालेल्या लोकांकडून पण हा आजार पसरत आहे. जसं त्या दिवशी पार्टीत घडलं.
मला माहित आहे अनेकांना वाटत आहे कि या व्हायरस चा माझ्यावर काही परिणाम होणार नाही, तो होऊ हि नये अशी माझी इच्छा आहे. पण इथे सिएटल मध्ये लोकांनी लवकर निदान करून न घेतल्याने किंवा शासनाने त्यांची टेस्टिंग न केल्याने करोनाव्हायरस आता न टाळता येणारा धोका बनला आहे. मला आता बरं वाटत आहे आणि मी जे सहन केलं अशी वेळ कुणावर हि येऊ नये अशी माझी इच्छा आहे.

करोनाव्हायरस च सर्वात धोकादायक लक्षण म्हणजे श्वसनाचा त्रास , मला हा झाला नाही. मला असं वाटतं कि दरम्यानच्या काळात मी दररोज Sudafed Tablets घेत होते , दिवसातून ३ वेळा नेजल स्प्रे वापरत होते आणि Neti Pot (नाक स्वच्छ करण्यासाठी चे प्युरिफाइड पाणी ) चा सुद्धा वापर करत होते त्याचा मला फायदा झाला. याच्यामुळे सायनस मोकळं होऊन  फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन होण्याचा धोका कमी झाला. मी जे सांगतीये तो वैद्यकीय सल्ला अजिबात नाहीये,तर यातून काळजी घेण्यासाठी जे जे काय मी केलंय ते फक्त तुमच्याशी शेयर करत आहे अर्थात हे सर्व उपाय किती आणि कोणत्या प्रमाणात या व्हायरस ची लागण झाली त्यावर अवलंबून सुद्धा असू शकतात.

मला आशा आहे कि मी शेयर केलेल्या अनुभवामुळे लोक या आजारापासून स्वतःचा बचाव करू शकतील किंवा जर त्यांच्यात थोडीही लक्षणे दिसत असतील तर तात्काळ टेस्ट्स करून घेतील, कुणाला श्वसनाचा त्रास होत असेल तर हि आयसोलेशन मध्ये जाण्याची वेळ आहे हे समजून घ्यावे. नियमित हात धुण्यामुळे करोनाव्हायरस चा संसर्ग होणारच नाही याची शाश्वती नाही , विशेषतः पब्लिक प्लेसेस मध्ये जर तुम्ही संसर्ग झालेल्या पण लक्षणे दिसत नसलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलात तर जास्त धोका आहे. करोनाव्हायरस चा संसर्ग झाल्याने तुमचा मृत्यू होईल याची शक्यता फार कमी आहे , परंतु आपल्या परिवारातील ६० पेक्षा जास्त वयाच्या लोकांचा किंवा कमी निरोगी व्यक्तींचा जीव तुमच्यामुळे नक्कीच धोक्यात येऊ शकतो.

Stay healthy folks!”

एलिझाबेथ श्नायडर

मूळ फेसबुक पोस्ट ची लिंक –
https://www.facebook.com/EbethBerkeley/posts/10110434821081713?__tn__=K-R

Leave a Comment