SEBI Notice | एक वर्षांपूर्वी अमेरिकेन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग यांनी केलेल्या रिसर्चमध्ये प्रसिद्ध केले होते. त्यानुसार आदानी समूहामध्ये वादग्रस्त अहवाल जाहीर केला होता. या गोष्टीला आता बराच वेळ झालेला आहे. परंतु तरीही अजूनही या गोष्टीची चर्चा होत आहे. आता हा अहवाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण आता या अहवालामुळे आदानी समूहाच्या सहा कंपन्यांना सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्याकडून कारणे दाखवा यासाठी नोटीस (SEBI Notice) प्राप्त झाली आहे.
आदानी इंटरप्राईजेसने स्वतः सेबीकडून (SEBI Notice) कारणे दाखवायची नोटीस आली आहे. ही माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे कंपनीने शेअर बाजारांना गुरुवारी याबाबत नोटीस देखील दिलेली आहे. यावेळी कंपनीने असे म्हटले आहे की, SBEI कडून त्यांना प्राप्त झालेल्या कारणे दाखवा या नोटीस त्यांच्या नियमांचे पालन न केल्यामुळे आहे.
या आठवड्यामध्ये आदानी स्पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनोमिक झोन, अदानी पावर, अदानी एनर्जी सोल्युशन आणि अदानी टोटल गॅस यांच्यासह अनेक समूहातील कंपन्यांना ही सेबीकडून कारणे दाखवायची नोटीस मिळालेली आहे. याबाबतची माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिलेली आहे. यावेळी अदानीने असे म्हटले आहे की, मार्च 2024 मध्ये तिमाहीमध्ये सेबीकडून प्राप्त कारणे दाखवा नोटीसचा मागील आर्थिक वर्षाच्या व्यवहारांवर कोणताही परिणाम झालेला नाही. त्यामुळे लागू झालेले या नियमांचे अधिक कायद्याचे पालन न केल्यास त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही.
य अहवालात (SEBI Notice) आदानी समूहाची प्रमुख कंपनीचे असे म्हणणे आहे की, जानेवारी 2023 मध्ये जे वादग्रस्त अहवाल झाला. त्यानंतर एका लॉ ऑफरने स्वतंत्र मूल्यांकन केले आहे. आणि त्या मूल्यांकनातून असे दिसून आले आहे की, हिंडनबर्गच्या अहवालात संबंधित पक्ष म्हणून उल्लेख केलेल्या मूळ कंपनीची किंवा तिच्या कोणत्याही उप कंपनीची याचा संबंध नाही. याबरोबर या रिसर्चने आदानी समूहावर शेअर किमतीच्या हेराफेरीबद्दलही अनेक गंभीर आरोप केलेले होते. त्यानंतर त्यांचा हा वाद खूप वाढला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने बाजार नियमक सेबी या प्रकरणाची चौकशी केली होती. यावेळी हिंडनबर्ग संशोधनाने अदानी समूहाविरुद्ध केलेले सगळे आरोप कथित असल्याचे देखील समोर आलेले होते.