पुणे | सुनिल शेवरे
भारत हा विविधतेचा देश आहे. या देशांत राहणाऱ्या प्रत्येकाला सरकार विरोधात टीका करण्याचा अधिकार आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार वंदना चव्हाण यांनी व्यक्त केलं. पुण्यात आयोजित राष्ट्रवादी पक्षाच्या स्नेहमेळाव्यात त्या बोलत होत्या. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आज हिरावुन घेतल जात आहे. आताच्या विचारवंतांना नक्षलवादी म्हणून पकडून अटक करत आहेत, या देशात सर्व जाती धर्माची माणस राहतात आणि आपला पक्ष सर्वधर्मसमभावाची नेहमी कास धरून आहे. काहीही झालं तरी धर्मनिरपेक्षता जपणं महत्वाच आहे. सध्याचं हुकमी सरकार आहे उलथुन टाकण्याची ताकद राष्ट्रवादीत आहे आणि त्यासाठी सज्ज व्हा, असंही त्या म्हणाल्या. येत्या निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून देऊ. दरम्यान अधिक क्षमतेने काम करता येण्यासाठी लोकांना पदमुक्त करा म्हणजे, अस आवाहनही चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठींना केलं.
या स्नेहमेळाव्यात पुणे शहर अध्यक्ष चेतन तुपे, शहर उपाध्यक्ष कृष्णकांत कुदळे, दत्तात्रय धनकवड़े आदी उपस्थित होते.