हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांग्लादेशमध्ये अराजकता माजली आहे. हिंसाचार, जाळपोळीने संपूर्ण देश दहशतीखाली आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊनही अजूनही परिस्थिती आटोक्यात आलेली नाही. वरवर जरी हा विषय आरक्षणाचा वाटत असला तरी यामध्ये कोणत्या तरी परीकय शक्तीचा हात असावा, त्याशिवाय इतकं मोठं आंदोलन पेटणार नाही असा अंदाज लावला जातोय. याबाबत किती खरं- खोटं ते येत्या दिवसात समोर येईलच. पण भारतावरही अशाच प्रकारे अनेकदा परकीय षडयंत्र रचलं गेलं, मात्र प्रत्येक वेळी केंद्रातील मोदी सरकारच्या कणखर भूमिकेमुळे हि षडयंत्र हाणून पाडण्यात देशाला यश आले… जाणून घेऊयात त्याचीच हि एक अनटोल्ड स्टोरी!……
देशाला अस्थिर करण्याच्या उद्देशाने होणाऱ्या परकीय हस्तक्षेपांना रोखून भारताने बांगलादेशसारखी परिस्थिती यशस्वीपणे टाळली आहे. अनेकदा भारताविरुद्धही अशी षडयंत्र रचण्यात आली, आणि देशात अशांतता भडकवण्याच्या प्रयत्न काही परकीय शक्तींनी केला, मात्र भारत सरकारच्या सक्रिय उपाययोजनांमुळे या देशात लोकशाही मूल्ये जपली जातील आणि भारत हा एक सुरक्षित आश्रयस्थान राहील याची खात्री झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच भारत-बांगलादेश सीमेवरील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या एडीजी आणि भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली. ही समिती बांगलादेशातील भारतीय नागरिक, हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी बांगलादेशातील समकक्षांशी जवळून काम करेल. ही आव्हाने हाताळण्यात भारत यशस्वी ठरेल असा विश्वस तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.
अभिजित अय्यर मित्रा, इन्स्टिट्यूट ऑफ पीस अँड कॉन्फ्लिक्ट स्टडीज (IPCS) चे वरिष्ठ फेलो, संभाव्य नुकसान टाळण्यासाठी भारताचे मजबूत परराष्ट्र धोरण आणि विदेशी एनजीओ फंडिंगच्या कठोर नियमनाचे श्रेय देतात. ते अधोरेखित करतात की ओमिड्यार आणि हिंडेनबर्ग सारख्या ग्रुपने त्यांच्या निहित स्वार्थांसाठी भारतावर जाणीवपूर्वक टीका केली , परंतु सरकारच्या कठोर भूमिकेमुळे महत्त्वपूर्ण नुकसान होण्यापासून रोखले गेले आहे.प्रमित पाल चौधरी, परराष्ट्र धोरण आणि राजकीय अर्थव्यवस्थेचे तज्ज्ञ, यांनीही एक गोष्ट निदर्शनास आणली. त्या म्हणाल्या, बांगलादेशातील हिंदूंना 1971 पासून राजकीय आणि धार्मिक हेतूने अनेकदा हल्ल्याना सामोरे जावं लागलं. बांगलादेशातील हिंदूंना पद्धतशीरपणे लक्ष्य करणे आणि 1971 च्या नरसंहारादरम्यान पाकिस्तानी सैन्याने वापरलेले डावपेच यांच्यात त्यांनी साम्य दाखवलं. जिथे बंगाली बुद्धीजीवी वर्गाला जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आले. या ऐतिहासिक तक्रारींमुळे बांगलादेशातील अलीकडील अशांततेने या प्रदेशातील अस्थिरतेत आणखी भर पडली आहे.
या आव्हानांना सहजतेने नॅव्हिगेट करण्याची भारताची क्षमता अलीकडच्या काही घटनांमधून दिसून आली. भारतात मागील वर्षी कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी आंदोल पुकारलं होते. ग्रेटा थनबर्ग आणि रिहाना सारख्या आंतरराष्ट्रीय व्यक्तींनी नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही भारत सरकार स्थिर राहिले, मजबूत राहिले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक शक्ती म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे आणि लोकशाही मूल्यांचे पालन करण्यास आणि राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे यावर अनेकांची सहमती आहे.