मुलीचा 12 वीचा निकाल पाहून शरद पोंक्षे भावूक, म्हणाले माझ्यावर कर्करोगाचे उपचार सुरू असताना तिने..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. अभिनेते शरद पोंक्षे यांची मुलगी सिद्धी पोंक्षेसुद्धा बारावीत होती. तिचा निकाल पाहून शरद पोंक्षे भावूक झाले व त्यांनी फेसबुकवर तिच्यासाठी पोस्ट लिहिली.

‘२०१९ मध्ये माझ्या कर्करोगावरील उपचार सुरू असताना, हॉस्पीटलमध्ये येऊन, कॉलेजचा अभ्यास करून एवढ्या टेन्शनमध्ये असतानाही पिल्लूनं ८७ टक्के मार्क विज्ञान शाखेत मिळवले. अभिमान वाटला मला व सतत वाईट बातम्या चहूबाजूंनी येत असताना एवढी चांगली बातमी सांगायला आनंद होतोय’, अशी पोस्ट त्यांनी लिहिली.

सहा महिने औषधोपचार करून शरद पोंक्षेंनी कर्करोगावर यशस्वीरित्या मात केली. त्यानंतर त्यांनी ‘हिमालयाची सावली’ या नाटकातून पुनरागमन केलं. शरद पोंक्षे यांनी दूरचित्रवाणीवरील अनेक मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप सोडली. दूरदर्शन वरील ‘दामिनी’ या अत्यंत गाजलेल्या मालिकेत त्यांची महत्वाची भूमिका होती. ‘अग्निहोत्र’, ‘वादळवाट’, ‘कुंकू’, ‘कन्यादान’, ‘उंच माझा झोका’ या मालिकांनी शरद पोंक्षे यांना महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment