16 लाखांचा मुद्देमाल जप्त : बेकायदा दारू वाहतूक प्रकरणात ट्रकसह एकजण ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

गोवा बनावटीची 21 दारूची बॉक्स घेऊन निघालेल्या ट्रकवर कराड तालुक्यातील शिंदेवाडी गावच्या हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत सुमारे 16 लाखाच्या मुद्देमालासह ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आले आहे. बयाजी तुकाराम साळुंखे (वय 65, रा. कदमवाडी कुठरे, ता. पाटण) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, कराड-ढेबेवाडी रोडवर शिंदेवाडी गावच्या हद्दीत समर्थ मंगल कार्यालयासमोर सहा चाकी ट्रक संशयास्पद आढळून आला. यावेळी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने ट्रकची तपासणी केली असता, ट्रकमध्ये गोवा बनावटीची 21 दारूची बॉक्स आढळून आली. त्याच्याकडून सुमारे 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

या कारवाईमध्ये निरीक्षक आर. एस. पाटील, दुय्यम निरीक्षक आर. एस. माने, एस. बी. जंगम, बी. एस. माळी, जवान विनोद बनसोडे, महिला जवान आर. के. काळोखे यांनी सहभाग घेतला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात ट्रकचाही क्रमांक (एमएच- 43- यू- 5859) समावेश आहे.

Leave a Comment