कराड | भारतातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल लागला असून कराड येथील कोटा अकॅडमीच्या चार विद्यार्थ्यांनी जगप्रसिद्ध अशा आयआयटी मध्ये जाण्यासाठी घवघवीत यश मिळवले. गेली 15 वर्षे कोटा अकॅडमी कराड येथे इंजिनिअरिंगला जाण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयआयटी व मेडिकलला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नीट या परीक्षेची तयारी करून घेत आहे.
कोटा अकॅडमीचे संचालक डॉ. महेश खुस्पे व सौ . मंजिरी खुस्पे यांच्या मार्गदर्शनाखाली कोटा अकॅडमी कराडने आत्तापर्यंत शेकडो विद्यार्थाना आयआयटीला जाण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. व त्यात 150 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यावर्षी आदित्य विकास पाटील, अनुप माने, सिद्धार्थ साळुंखे, राजनंदिनी कांबळे या विद्यार्थ्यांनी जेईई ऍडव्हान्स या परीक्षेत यश मिळवले असून जगप्रसिद्ध अशा इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांची निवड झाली आहे.
देशातून 2 लाख 50 हजार मुलांनी हि परीक्षा दिली होती. गेले दिड वर्ष ऑनलाईन पद्धतीने शिकून सुद्धा त्यांनी हे यश संपादन केले. विशेष म्हणजे हि सर्व मुले ग्रामीण भागातील असून ग्रामीण भागात सुद्धा चांगल्या बौद्धिक क्षमतेची व मेहनत करणारी मुले असतात हे सिद्ध झाले आहे. ग्रामीण भागातील मुलांना आयआयटी , एम्स सारख्या संस्थांमध्ये प्रवेश मिळावा हा दृष्टीकोन ठेऊन कोटा अकॅडमीची स्थापना खुस्पे दाम्पत्याने 2006 साली केली होती. इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना कोटा अकॅडमी मध्ये शिकवले जाते. यशस्वी विद्यार्थ्यांचे कोटा अकॅडमी व कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स तर्फे कोटा अकॅडमीचे संचालक डॉ. महेश खुस्पे व सौ. मंजिरी खुस्पे यांनी हार्दिक अभिनंदन केले .