साताऱ्यातील तिघांची खेलो इंडिया युथ गेम्ससाठी निवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

खेलो इंडिया युथ गेम्ससाठी महाराष्ट्रातील बॉक्सिंगमध्ये 12 खेळाडूची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी 3 खेळाडू साताऱ्यातील आहेत. हरियाणा येथे होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्ससाठी निवड झालेल्या खेळाडूचा सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेने सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

दि. 3 ते 12 जून 2022 दरम्यान हरियाणा येथे होणाऱ्या चाैथ्या खेलो इंडिया यूथ गेम्ससाठी सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या 3 खेळाडूंनी राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धांमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. निवड झालेल्या खेळाडूत रिशिका रवींद्र होले (52-54 किलो), आर्या देवेंद्र बारटक्के (57-60 किलो) आणि ओमकार संजय गाढवे (75-80 किलो) यांचा समावेश आहे. सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे प्रशिक्षक सागर जगताप आणि अमित सांगवान यांचे खेळांडूना मार्गदर्शन लाभले.

खेळाडूंच्या निवडीबद्दल सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी खेळाडूंचा सत्कार केला. तसेच खेलो इंडिया स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विभागीय सचिव योगेश मुंदडा, बॉक्सिंग क्लबचे पदाधिकारी मंगेश जाधव, रवींद्र होले, देवेंद्र बारटक्के आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment