Semiconductor Project In Maharashtra : महाराष्ट्रातील पहिला सेमी कंडक्टर प्रकल्प नवी मुंबईत सुरु; 4000 जणांना नोकऱ्या मिळणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रासाठी आणि राज्यातील तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रतील पहिला सेमी कंडक्टर प्रकल्प (Semiconductor Project In Maharashtra) नवी मुंबईतील महापे MIDC येथे सुरु झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भारतरत्न सचिन तेंडुलकर, जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ.अनिल काकोडकर, उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, मुंबई पोलीस दलाच्या फोर्स वनचे प्रमुख कृष्ण प्रकाश, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे, आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र चोडणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

4 हजार नोक-या उपलब्ध होणार – Semiconductor Project In Maharashtra

IRP इलेक्ट्रॉनिक कंपनीचा हा प्रकल्प आहे. हा देशातील सर्वात मोठा सेमी कंडक्टर प्रकल्प (Semiconductor Project In Maharashtra) आहे. यातून राज्यात 2 टप्प्यांत मिळून तब्बल 36 हजार 573 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटी आणि त्यानंतर २४ हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 4 हजार नोक-या उपलब्ध होणार आहेत. IRP हा मराठी उद्योजकाचा महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं बनवणारा अग्रगण्य समूह असून, या प्रकल्पांतर्गत इस्त्रायल आणि स्पेनमधील कंपन्यांचाही सहभाग आहे. या नव्या सेमी कंडक्टर प्रकल्पामुळे नवी मुंबईत रोजगाराच्या संधी येत्या काळात नक्कीच वाढतील.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले हे शासन दिलेला शब्द पाळणारे आहे. लाडकी बहीण योजना यशस्वी करुन दाखविली. इतर योजनाही यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. विविध प्रकल्प पूर्णत्वास आणण्याच्या दृष्टीने जलद गतीने कामे सुरु आहेत. अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई मधील दोन तासाचे अंतर आता अवघ्या 20 मिनिटांवर आले आहे. महाराष्ट्रात बदल घडविणारे प्रकल्प आम्ही साकार करीत आहोत. राज्य शासनाने दाओसमध्ये पाच लाख करोडच्या उद्योग करारांवर सह्या केल्या आहेत. लोकांच्या हातांना निश्चित काम मिळेल. इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर युनिटमध्ये 400 लोकांना काम मिळणार आहे. या माध्यमातून अडॅव्हान्स टेक्नोलॉजी आपल्या राज्यात येत आहे. हे शासन सर्वांसाठी आहे. उद्योजकांना सबसीडी देण्यात येत आहे. आतापर्यंत मोठे उद्योग महाराष्ट्रात आले आहेत, आणखी येत आहेत.