आता इंटरनेटशिवाय पाठवणार फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट; WhatsApp आणणार हे खास फीचर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आपल्याला व्हाट्सअपवरून (WhatsApp) फोटो, व्हिडिओ किंवा कोणतीही फाईल पाठवायची असेल तर त्यासाठी इंटरनेट लागत होते. परंतु आता नव्या फीचरमुळे इंटरनेट नसतानाही फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट आणि बऱ्याच गोष्टी व्हाट्सअपवरून शेअर करता येणार आहे. याबाबतची माहिती WABetaInfo कडून देण्यात आली आहे. या नव्या फीचरमुळे कोणत्याही अडथळ्याशिवाय व्हाट्सअपवरून एखादी माहिती दुसऱ्या व्यक्तीला पाठवली जाईल. याकरिता फक्त मोबाईलमधले ब्लूटूथ चालू करण्याची आवश्यकता असेल.

WABetaInfo दिलेल्या माहितीनुसार, आता इथून पुढे युजर्स ला व्हाट्सअपवरून फाईल, फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स पाठवण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता भासणार नाही. तर फक्त मोबाईल फोनमधले ब्लूटूथ सुरू करून आपल्याला हवी ते माहिती शेअर करता येईल. महत्वाचे म्हणजे, या फाइल्स ऑफलाईन पद्धतीने शेअर करण्यासाठी तुमच्यासह समोरील डिव्हाइसमध्ये देखील ऑफलाइन फाइल-शेअरिंग फिचर असायला हवे. हे फिचर नसल्यास समोरील व्यक्तीला ऑफलाइन पद्धतीने कोणतीही माहिती पाठवता येणार नाही.

तसेच युजरने ॲपमध्ये तीच स्क्रीन ओपन केली असेल आणि दुसऱ्या डिव्हाइससाठी परवानगी दिली असेल तरच दोन्ही डिव्हाइस एकमेकांना कनेक्ट होऊ शकते. या प्रक्रियेला ऑप्ट-इन असे म्हणले जाते. ज्यामध्ये तुमच्या परवानगी शिवाय दुसरा कोणताही व्यक्ती तुम्हाला कोणतीही फाईल पाठवू शकत नाही. या सर्व प्रक्रियेत फाईल पाठवणाऱ्याचा आणि प्राप्तकर्त्याचा फोन नंबर दिसणार नाही. यामुळे दोन्ही बाजूची माहिती गोपनीय आहे. तसेच चुकीच्या व्यक्तीला माहिती जाण्याची चिंता नसेल.

दरम्यान, सध्या दिवसेंदिवस होत चाललेल्या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे विविध फीचर्स युजरसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यापूर्वी देखील व्हाट्सअपकडून आपल्या युजरसाठी अनेक खास फीचर्स लॉन्च करण्यात आली होती. त्यानंतर आता इंटरनेटशिवाय फाईल, फोटो व इतर माहिती पाठवण्याचे देखील फीचर व्हाट्सअपकडून आणले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु हे फीचर नेमके कधीपर्यंत लाँच होईल, याबाबत कोणतेही माहिती देण्यात आलेले आहेत.