ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी कार अपघातात जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या कारला पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर अपघात झाला आहे. अभिनेत्री शबाना आझमी जखमी झाल्या आहेत.गाडीचा चालक जखमी झाला आहे. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर सुद्धा कारमध्ये होते मात्र त्यांना कोणतीही जखम झालेली नाही. ते सुरक्षित आहेत. आझमी यांच्या कारची ट्रकला धडकल्याने हा अपघात घडला. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील खालापूर टोलनाक्याजवळ हा अपघात झाला आहे.घटनास्थळावर पोलिसांनी तातडीने धाव घेत शबाना आझमी यांनी मदत पुरवली. शबाना आझमी यांना जखमी अवस्थेत पनवलेच्या एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

आझमी यांच्या MH02 CZ 5385 या कारला भीषण अपघात झाला नसून कारचा एक भाग चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातातून शबाना आझमा थोडक्यात बचावल्या आहेत. त्यांच्या चेहऱ्याला जखम झाल्याचे दिसत आहे.

Untitled design (91)

Leave a Comment