Senior Citizen Saving Scheme | आज-काल महागाईचा आणि बदलत्या जीवनशैलीचा विचार करून लोकांनी आपला रिटायरमेंट प्लॅन तयार करणे खूप गरजेचे आहे. आपल्या म्हातारपणासाठी काही निधी जमा करून ठेवणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून उतार वय झाल्यानंतरही आपल्या आयुष्यात इतर गोष्टींसाठी आपल्याला कोणावरही आर्थिक दृष्ट्या अवलंबून राहता कामा नये. यासाठी तुम्ही सीनियर सिटीजन सेविंग स्कीम मध्ये गुंतवणूक करू शकता. या योजनेमध्ये मुलं त्यांच्या आई-वडिलांसाठी देखील खाते उघडू शकतात. तुम्ही आई आणि वडिलांचे वेगवेगळे खाते ओपन करू शकता.
उतार वयात कोणत्याही प्रकारचा आर्थिक प्रश्न उभा राहू नये. यासाठी रेग्युलर इनकम सोर्स असावा, असे अनेकांना वाटते. आणि त्यासाठी गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही असे केले, तर उतार वयात तुमच्यासाठी खूप चांगला निधी जमा होईल. ही योजना तीन वर्षासाठी चालू ठेवू शकता. मॅच्युरिटी पिरियड पूर्ण झाल्यावर तुम्हीही रक्कम काढून घेऊ शकता. आणि नवीन अकाउंट तयार करू शकता.
सध्या या सीनियर सिटीजन सेविंग स्कीममध्ये 8.2% दराने व्याजदर दिले जाते. या योजनेचे पैसे तीन महिन्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतात. या योजनेत तुम्ही कमीत कमी 1 हजार रुपयांनी जास्तीत जास्त 30 लाख रुपयांची देखील रक्कम मिळवून देऊ शकता. या योजनेचा कालावधी तीन वर्षासाठी आहे. तुम्ही जवळील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या सीनियर सिटीजन सेविंग स्कीमचे खाते उघडू शकता.
या सीनियर सिटीजन सेविंग स्कीममधून (Senior Citizen Saving Scheme) तुम्हाला चांगला इन्कम सोर्स येईल. म्हणजे उतार वयात दर महिन्याच्या शेवटी तुमच्या हातात एक ठराविक रक्कम येईल आणि त्यानुसार तुम्हाला तुमचे बजेट देखील ठरवता येईल. या योजनेमध्ये तुम्हाला टॅक्सची सवलत देखील उपलब्ध आहे. या योजनेच्या सेक्शन एनसीसी या कलम 80c अंतर्गत 1.5 लाखांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला कर सूट मिळते.
योजनेमध्ये खातं उघडण्यास पात्र कोण? | Senior Citizen Saving Scheme
- ज्या व्यक्तीचे वय 60 वर्षे पूर्ण झाले असेल, तो व्यक्ती सीनियर सिटीजन सेविंग स्किमचे खाते उघडण्यास पात्र आहे.
- या उमेदवारांचे वय 50 वर्षापेक्षा जास्त आणि 60 वर्षापेक्षा कमी आहे अशा रक्षा कर्मचाऱ्यांना देखील या योजनेमध्ये खाते उघडण्यास मान्यता आहे.
- 55 वर्षापेक्षा जास्त आणि 50 वर्षापेक्षा कमी असलेले रिटायरमेंट कर्मचारी देखील या योजनेअंतर्गत खाते उघडू शकतात.