60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना घराजवळच मिळणार लस, केंद्राची मार्गदर्शक सूचना जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या राज्यात जरी कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटत असताना चित्र पाहायला मिळत असलं तरी लसीकरण मोहीम मात्र तीव्र करण्यात आली आहे. सध्या पंचेचाळीस वर्षांवरील व्यक्तींकरिता दुसरा आणि पहिला डोस देण्यात येत आहे. आता मात्र दिव्यांग आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा लसीकरण अधिकच सुलभ करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल शासनानं उचलले आहे. दिव्यांग आणि ज्यांचे अद्याप लसीकरण झालेलं नाही किंवा ज्यांनी आतापर्यंत केवळ पहिला डोस घेतलाय अशा 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी आता त्यांच्या राहत्या घराजवळ लसीकरण केंद्र उभारण्याची सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिली आहे.

सर्व राज्यांना सूचना

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नॅशनल एक्सपोर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन ऍडमिनिस्ट्रेशन फोर covid-19 समितीने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिव्यांग आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी ‘नियर टू होम covid-19’ सेंटर उभारण्याची शिफारस केली होती. ही शिफारस आता केंद्राने मान्य केली असून सर्व राज्यांना नियर टू होम covid-19 सेंटर सुरू करण्याची सूचना दिली आहे.

याकरिता 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिक ज्यांचे अद्याप लसीकरण झाले नाही किंवा एक डोस घेतला आहे. तसेच सर्व दिव्यांग नागरिक पात्र असतील. सरकारच्या या निर्णयामुळे सर्व दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना आता त्यांच्या राहत्या घराच्या जवळच कोरोनाची लस उपलब्ध केली जाणार आहे. या गटाची शारीरिक स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन गटांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला नियर टू बॉम्बे सेंटर लस उपलब्ध करून दिली जाणार नाही.