हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नुकतेची जीएसटीच्या दराबाबत मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे. या बैठकीमध्ये जेष्ठ नागरिकांना त्यांच्या जीवनविमा आरोग्य विमासाठी भरलेला प्रीमियम करमुक्त करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक मोठी बातमी आलेली आहे. तुम्ही तर पाच लाखापेक्षा जास्त आरोग्य विमा प्रिमियमवर 18 टक्के जीएसटी लागू राहील. तसेच सध्या टर्म पॉलिसी आणि फॅमिली यांच्यासाठी जीवन विमा टर्म बरोबर 18% जीएसटी आकारला जातो. परंतु आता हा प्रीमियम ५ टक्के पर्यंत कमी करण्याबाबत निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे.
याबाबत बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी मंत्री यांनी सांगितले की, “गटातील प्रत्येक सदस्याला दिलासा द्यायचा आहे. तसेच जेष्ठ्य नागरिकांकडे विशेष लक्ष देणार आहे. आम्ही परिषदेला अहवाल देखील सादर करणार आहोत. ज्येष्ठ नागरिकांसाठी असू शकत नाही. जीएसटी कौन्सिलने मागे नाही आरोग्य आणि जीवन विमा प्रीमियमवरील तेरा सदस्य गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गोवा, गुजरात, मेघालय इत्यादी अनेक राज्यांचा समावेश होता.
त्याचप्रमाणे या मंत्र्यांच्या गटांनी शनिवारीविद्यार्थ्यांच्या बाटल्या, सायकली आणि वह्यांवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा दर पाच टक्क्यांनी कमी करण्यात येणार आहे. तसेच महागड्या घडाळ्यावरील कर वाढवण्याची देखील सूचना दिलेली आहे. 20 लिटर पेक्षा जास्त क्षमता असलेल्या पाण्याच्या बाटलींवरील जीएसटी हा 18% न वरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करणार आहे. तसेच वह्यांवरील जीएसटी हा 12% म्हणून पाच टक्के करण्यात येत आहे. त्यामुळे आता अनेक गोष्टींवरील जीएसटी कमी होणार आहे. परंतु यात विमा इन्शुरन्सचा ज्येष्ठ नागरिकांना मात्र चांगलाच फायदा होणार आहे.