Saturday, March 25, 2023

हर्षवर्धन पाटलांचं ठरलं ! ११ सप्टेंबरला करणार भाजपमध्ये प्रवेश

- Advertisement -

मुंबई प्रतिनिधी | कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी सहकार ,पणन आणि संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याचा भाजप प्रवेश कॉंग्रेससाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जाते आहे. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती मध्ये हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

इंदापूर येथे कार्यकर्त्यांचा मेळवा घेवून हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांना विचारले पुढील राजकारणाची दिशा काय असावी. त्यावर कार्यकर्त्यांनी मोठ्या सुरात भाजप मध्ये चला अशा घोषणा सुरु केल्या. हर्षवर्धन पाटील यांनी तुमच्या मताचा मी निश्चित आदर करेल. पुढील काही दिवसात विचार करून तुम्हाला निर्णय सांगले असे म्हणले होते. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्याने हर्षवर्धन पाटील यांना पराभवाचे तोंड बघावे लागले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीने आम्ही जिंकलेली जागा आम्ही सोडणार नाही असा निर्धार केला आहे. म्हणून हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करून तिकडचे तिकीट घेऊन विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात येणाऱ्या इंदापूर मतदारसंघाचे हर्षवर्धन पाटील हे नेते आहेत. ते भाजपमध्ये जाण्याने २०१४ सालच्या लोकसभेसाठी सुप्रिया सुळे यांच्यासाठी निश्चितच हे आव्हान तयार होणार आहे.