भारतीय ‘लेसकॅश’ अर्थव्यवस्था झाले आहेत; नोटबंदीवरून चिदंबरम यांचा मोदींना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारवर सध्या विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी नोटबंदीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला टोला लगावला आहे. “पहिल्यांदा आपल्या पंतप्रधानांनी म्हटले की, भारतीय अर्थव्यवस्था ही कॅशलेस बनली पाहिजे. मात्र त्यानंतर नोटबंदीचा निर्णय घेतला. या एका निर्णयामुळे कॅशलेस होण्याऐवजी लेस कॅश झालो आहोत, अशी टीका चिदंबरम यांनी केली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी नोटबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हनाले आहे की, नोटबंदीच्या दुर्दैवी निर्णयाला पाच वर्ष पूर्ण झाले आहेत. या निर्णयामुळे लोकांचा किती फायदा झाला? “पहिल्यांदा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले की, भारतीय अर्थव्यवस्था ही कॅशलेस बनली पाहिजे. मात्र त्यानंतर त्यांनी कालांतरानंतर निर्णय बदलला. त्यांनी एकदम अचानक नोटबंदीचा निर्णय घेतला. या एका निर्णयामुळे अनेकांना आर्थिक तोटाही झाला. त्यामुळे आता आपण कॅशलेस होण्याऐवजी लेस कॅश झालो.

देशातील काळा पैशांचा निर्णय झाल्याने नोटबंदीचा विचार करीत त्याची अंलबजावणी करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. नोटबंदीनंतर कुठलाही काळा पैसा बाहेर आला नाही. एवढेच नाही तर नोटबंदी जेव्हा करण्यात आली तेव्हा देशभरात 18 लाख कोटी रुपये चलनामध्ये होते. तर आता सध्या 28.5 लाख कोटी रुपये चलनामध्ये आहेत. म्हणजेच मोदींचा दुसरा उद्देश देखील फसल्याचे दिसून येते.

Leave a Comment