कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड येथील शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना पोलीस उपअधिक्षकपदी (DYSP) पदोन्नती मिळाली. त्याच्या निवडीबद्दल पोलिस कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी आज दिवसभर पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. बी. आर. पाटील यांनी पोलिस दलात गेली 32 वर्षे काम केले आहे.
पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पोलीस उपअधिक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर नियमित पदोन्नतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली. राज्यातील 175 अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. कराड येथील शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बी. आर. पाटील हे कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी मुंबई, कोल्हापूर, सातारा, कराड, लोणावळा, तसेच क्राईम ब्रँच मुंबई येथेही सेवा बजावली आहे.
कराड येथील त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक मोठ्या गुन्ह्यांची उकल होण्याबरोबरच अट्टल गुन्हेगारांना त्यांनी गजाआड केले आहे. बी. आर. पाटील यांच्या या पदोन्नतीबद्दल त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे. मनसेचे दादासाहेब शिंगण, अभयकुमार देशमुख, सुनिल परीट, विशाल पाटील, सकलेन मुलाणी, अमोल टकले यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक तब्बसुम शादीवान, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू डांगे, उदय दळवी, अर्जुन चोरगे, प्रवीण जाधव, संतोष पवार, सागर चव्हाण यांच्यासह पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.