वैद्यकीय क्षेत्रात खळबळ : कराड तालुक्यात दुसरा बोगस डाॅक्टर पोलिसांच्या ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

नारायणवाडी येथील बोगस महिला डॉक्टरची तपासात चाैकशी सुरू असताना पोलिसांनी आणखी एका बोगस डॉक्टरचा पर्दाफाश केला आहे. सुदर्शन हर्षवर्धन जाधव (वय- २६, रा. रेठरे खुर्द) असे त्यांचे नाव आहे. सुदर्शन जाधव हा फार्मासिस्ट असून रेठरे परिसरात डाॅक्टर म्हणून काम करत होता. कराड तालुक्यात तपासात दुसरा डॉक्टर बोगस आढळल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

नारायणवाडी येथे बोगस डॉक्टर सुवर्णा मोहितेचे पंत क्लिनिक याचा सुदर्शन जाधव मूळ मालक आहे. तो रेठरे बुद्रुक परिसरात बऱ्याच वर्षापासून प्रॅक्टिस करत असल्याचाही प्रकार समोर आला आहे. जाधव डॉक्टर नसून फार्मासिस्ट आहे, तरीही डॉक्टर असल्याचे भासवून प्रॅक्टिस करत होता. त्यालाही पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नारायणवाडी येथे सुवर्णा मोहिते या बोगस डॉक्टरला पोलिसांनी बुधवारी अटक केलेली आहे. तिच्या दवाखान्यात उपचार घेणाऱ्याचे जबाब नोंदवण्याचे काम सध्या पोलिस करत आहेत. या प्रकरणात शुक्रवारी आणखी एका बोगस डॉक्टरचा पोलिसांनी पर्दाफाश केला. त्यालाही बोगस डॉक्टर प्रकरणी गुन्ह्यात रात्री उशिरा अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक रेखा दूधभाते यांच्या पथकाने रात्री उशिरा बोगस डॉक्टर सुदर्शन जाधवला अटक केली.

पंत क्लिनिक नावाने जो दवाखाना सुवर्णां मोहिते ही बोगस डॉक्टर चालवत होती. त्याचा मूळमालक सुदर्शन जाधव आहे. तोही बोगस डॉक्टर निघाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक दुधभाते यांनी त्या प्रकरणात जाधवला सायंकाळी अटक केली. बोगस महिला डॉक्टरला चालविण्यास दिलेल्या पंत क्लिनिकचा जाधव मूळ मालक आहे, असे दुधभाते यांनी सांगितले.

Leave a Comment