आत्मनिर्भर पॅकेजनंतरही शेअर बाजारात पडझड; सेंसेक्स १ हजार अंकांनी धडाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या भारतीय अर्थकारणाला गतिमान कारण्यासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत अभिनय पॅकेजची घोषणा केली. केंद्राने हे पॅकेज भारतीय अर्थव्यस्थेला ररुळावर आणण्यासाठी मोठी मदत करेल असं म्हटलं होत. मात्र, या पॅकेजच्या घोषणा ऐकून निराश झालेल्या गुंतवणूकदारांनी आज जोरदार शेअर विक्री केली. त्यामुळे सोमवारी सकाळी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल १ हजार अंकांनी गडगडला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकात ३०० अंकांची घसरण झाली. आजच्या पडझडीत गुंतवणूकदारांचे किमान तब्बल ३ लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मागील ५ दिवस केंद्र सरकारचे आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केले. या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये बहुतांश उद्योगांना आर्थिक मदत न मिळाल्याने उद्योगांची पुरती निराशा झाली. त्यातच करोना व्हायरसवरून चीन आणि अमेरिका या देशांमधील तणाव वाढल्याचे भांडवली बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, आज बाजार खुलताच आजच्या सत्रात बँक आणि वित्त संस्थांच्या शेअरमध्ये विक्रीचे प्रमाण वाढलं आहे. सकाळी ११.२७ वाजता सेन्सेक्स १०४५ अंकांनी कोसळला आणि ३००५२ अंकांपर्यंत खाली आला आहे. निफ्टीत ३०९ अंकांची घसरण झाली असून तो ८८२७ अंकांवर आहे. आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये ३.४४ टक्क्यांची घसरण झाली. बजाज फायनान्स, ऍक्सिस बँक, एसबीआय, इंडसइंड बँक आदी शेअर २ टक्क्यांनी कोसळले आहे. विक्रीमुळे निर्देशांकात घसरण सुरु असून, गुंतवणूकदारांचे किमान ३ लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

तर दुसरीकडे आयटीसीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मा, इन्फोसिस, एचयूएल आदी शेअर तेजीत आहेत. दरम्यान, कोरोना रोखण्यासाठी सध्या सुरु असलेल्या लाॅकडाउनमुळे विमान सेवा देखील पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे सरकारकडून काही आर्थिक मदतीची अपेक्षा विमान कंपन्यांनी केली होती. मात्र याबाबत आत्मनिर्भर भारत अभिनयाअंतर्गत कोणतीच घोषणा न झाल्याने विमान कंपन्यांचा भ्रमनिरास झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment