September Bank Holiday | ऑगस्ट महिना संपायला काहीच दिवस राहिलेले आहेत. आणि नंतर सप्टेंबर महिन्याची सुरुवात होणार आहे. नवीन महिना चालू झाल्यानंतर आपण संपूर्ण महिन्याचे प्लॅनिंग करत असतो. आपल्याला महिन्याभरात काय काय करायचे? कोणते आर्थिक व्यवहार करायचे आहेत? हे सगळे पाहत असतो. परंतु जर बँके संबंधित तुमचे काही काम असेल, तर सप्टेंबर महिन्यात (September Bank Holiday) अनेक मोठे सण येणार आहे. त्यामुळे बँकांना खूप सुट्टी आहे. त्यामुळे तुमचे जर काम असेल तर आधी सुट्टी आहे की नाही हे पाहूनच करा अन्यथा तुमचा वेळ वाया जाईल.
पुढील सप्टेंबर महिन्यात (September Bank Holiday) बँकांना खूप सुट्ट्या आहेत. रिजर्व बँक ऑफ इंडिया आणि सप्टेंबर महिन्यात बँकांना किती दिवस सुट्ट्या राहणार आहेत? याची माहिती समोर दिलेली आहे. आरबीआयने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर सप्टेंबर महिन्यात किती दिवस बँका बंद असणार आहेत? हे सांगितलेले आहे. त्यामुळे तुम्हाला जर सप्टेंबर महिन्यात काही काम करायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात तब्बल 15 दिवस म्हणजे अर्धा महिना बँका बंद राहणार आहेत. परंतु वेगवेगळ्या राज्यात सुट्ट्यांचा कालावधी कमी जास्त आहे. आता राज्यानुसार सुट्ट्यांची यादी बदलणार आहे आपण पाहूयात की किती सुट्ट्या असणार आहेत.
सप्टेंबर महिन्यातील बँकेच्या सुट्ट्या खालीलप्रमाणे | September Bank Holiday
- 1 सप्टेंबर – या दिवशी महिन्यातील पहिलाच रविवार आहे त्यामुळे संपूर्ण देशात सगळ्या बँका बंद राहणार आहेत.
- 4 सप्टेंबर – या दिवशी श्रीमंत शंकर देवाची तिरू भाऊ तिथे असल्याने गुवाहाटी मधील सर्व बँका बंद राहणार आहेत.
- 7 सप्टेंबर – 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे या दिवशी गणपतीची स्थापना होते त्यामुळे संपूर्ण भारतात बँका बंद असणार आहे.
- 8 सप्टेंबर – 8 सप्टेंबर रोजी रविवार असल्याने देशातील सर्व बँका बंद असणार आहेत.
- 14 सप्टेंबर – या दिवशी दुसरा शनिवार असल्याने संपूर्ण भारतात या दिवशी बँकांना सुट्टी असणार आहे
- 15 सप्टेंबर – या दिवशी रविवार असल्याने देशातील सर्व बँका बंद असणार आहेत.
- 16 सप्टेंबर – बारावाफट याच्या निमित्ताने संपूर्ण भारतातील बँकांना सुट्टी राहणार आहे.
- 17 सप्टेंबर या दिवशी मिलाद ऊन नबी निमित्ताने गंगा टोक आणि राईपुर या ठिकाणातील बँका बंद असणार आहेत.
- 18 सप्टेंबर – पंग-लाहबसोल निमित्ताने गंगटोक येथील बँकांना सुट्टी राहणार आहे.
- 20 सप्टेंबर – या दिवशी ईद-ए-मिलाद-उल-नबी निमित्ताने जम्मू-काश्मीरमधील बँकांना सुट्टी राहणार आहे.
- 21 सप्टेंबर – या दिवशी श्री नारायण गुरु समाधी दिवस निमित्ताने कोची, तिरुवनंतपुरम येथे बँकांना सुट्टी राहणार आहे.
- 22 सप्टेंबर – या दिवशी रविवार असल्याने देशातील संपूर्ण बँका बंद असणार आहे.
- 23 सप्टेंबर – या दिवशी महाराजा हरिसिंह यांचा जन्मदिन असल्याने जम्मू, श्रीनगर येथील बँकांना सुट्टी राहील.
- 28 सप्टेंबर – चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी राहणार आहे.
- 29 सप्टेंबर – रविवार असल्याने या दिवशी देशातील सर्वच बँकांना सुट्टी राहणार आहे.