नवी दिल्ली । भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) टाटा मोटर्सविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. कंपनीवर बाजारात आपल्या मोनोपोलीचा फायदा घेतल्याचा आरोप आहे. हे लक्षात घेता, टाटा मोटर्सविरोधात बाजारपेठेतील डीलरशीप करारांमध्ये त्याच्या मजबूत स्थितिचा गैरवापर केल्याबद्दल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) आपल्या-45-पानांच्या आदेशात म्हटले आहे की, CCI ने असे निष्पन्न केले की, टाटा मोटर्सवरील मजबूत बाजारपेठेचा फायदा घेत व्यावसायिक वाहनांच्या डीलरशीप करारामध्ये अन्यायकारक अटी आणि नियम लादले गेले, जे प्रतिस्पर्धा कायद्यातील कलम 4 च्या तरतुदींचे उल्लंघन आहे.
टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस आणि टाटा मोटर्स फायनान्सची चौकशी
या प्रकरणात टाटा मोटर्स, टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि टाटा मोटर्स फायनान्स लिमिटेड यांच्या विरोधात दोन तक्रारींचा विचार करून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सीसीआयने आपल्या तपास युनिटचे महासंचालक (DG) यांना या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यास सांगितले आहे.
टाटा मोटर्सच्या 2 डीलर्सनी CCI कडे तक्रार दाखल केली होती की, कंपनी त्यांच्यावर वाहनांचे प्रमाण आणि विशिष्ट प्रकारच्या वाहनांचा साठा करण्यासाठी दबाव आणत आहे आणि ते यासाठी भाग पाडत आहे. त्याचबरोबर हे वाहन उद्योगाशी संबंधित नसले तरीही नवीन व्यवसाय सुरू करण्यास, कोणतीही नवीन उत्पादने घेण्यास किंवा विकण्यास प्रतिबंधित करीत आहे.
टाटाने कोणतीही चूक केली नसल्याचे म्हंटले आहे
CCI ने आपल्या आदेशात म्हटले आहे की, पहिले कंपनीने बाजारामध्ये आपल्या मजबूत उपस्थितीचा अयोग्य फायदा घेतला आणि डीलर्सवर दबाव आणला जे चुकीचे आहे. आयोगाने या प्रकरणाचा तपास DG कडे सोपविला आहे. तथापि, टाटा मोटर्सने या संदर्भात कोणतीही चूक नाकारली आहे. CCI चे फाईंडिंग्स अंतिम नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. टाटा मोटर्सची देशातील व्यावसायिक वाहनांमध्ये 40% पेक्षा जास्त हिस्सा आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा