भारतात कोरोना लसीची किंमत असू शकते 1000 रूपये; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कोरोनावरची लस तयार करणार आहेत, त्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर्श पूनावाला म्हणाले की, संपूर्ण जग कोविडशी झगडत आहे, म्हणून आम्ही त्याची किंमत ही कमीत कमी ठेवू. ते सुरुवातीला यावर नफा घेणार नाहीत. ते म्हणाले की, भारतात त्याची किंमत ही सुमारे 1000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असू शकते. एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करीत आहे. म्हणून, या लसीची मागणी खूपच जास्त असेल. अशा परिस्थितीत त्याचे उत्पादन आणि वितरण यासाठी आम्हाला शासकीय यंत्रणेची आवश्यकता भासेल. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने विकसित केलेल्या कोविड -19 ही लस तयार करण्यासाठी बायोफार्मास्युटिकल कंपनी AstraZeneca बरोबर पार्टनरशिप केलेली आहे.

पूनावाला म्हणाले की, कोविड -19 च्या या लसीची चाचणी ऑगस्टच्या अखेरीस 5,000 हजार भारतीय स्वयंसेवकांमार्फत सुरू केली जाईल. आवश्यक नोड्स मिळाल्यानंतर पुढील वर्षीच्या जूनपर्यंत ही लस लॉन्च केली जाईल.

या लसीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाईल
आम्ही ही लस मोठ्या प्रमाणावर तयार करणार आहोत आणि या आठवड्यातच आमच्या या लसीला मान्यता मिळणार आहे. पूनावाला म्हणाले की, डिसेंबरपर्यंत आम्ही ऑक्सफोर्ड लसीचे 30-40 कोटी डोस तयार करू शकू.

पूनावाला यांनी न्यूज चॅनेलशी बोलताना ला सांगितले की, यापूर्वी कोणत्याही लसी साठी इतके कष्ट करावे लागले नव्हते. कोरोनाच्या या लसीमुळे आम्ही बर्‍याच उत्पादनांकडे लक्ष देऊ शकत नाही आहोत. कोरोना साथीच्या वाढत्या संकटाकडे पाहता असे दिसते की, पुढील दोन-तीन वर्षे या लसीवर लक्ष केंद्रित करावे लागेल कारण संपूर्ण जगच कोरोना विषाणूशी झुंज देत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment