पालघरमध्ये तिसरे विमानतळ उभारा; देवेंद्र फडणवीस यांची मोदींकडे मोठी मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असून वाढवण बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी त्यांनी उपस्थिती लावली आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही उपस्थिती आहे. या कार्यक्रम प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणादरम्यान एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. मुंबईचा विस्तार येत्या काळात अधिक प्रमाणात वाढणार असून वसई विरार मध्ये हा विस्तार वाढणार आहेत आपण बंदरांचा रिक्लेमेशन करणार आहोत आणि या ठिकाणी एअरपोर्टछी रिक्रमेन्शन केलं पाहिजे. या ठिकाणी तिसरे विमानतळ झाले तर महाराष्ट्र अधिक पुढे जाईल अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

पुढील 50 वर्ष महाराष्ट्र नंबर वन राहील

या कार्यक्रमा प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, मुंबई आणि हा सर्व भाग देशाची आर्थिक राजधानी झाला. कारण मुंबई पोर्ट आणि जे एन पी टी पोर्ट आहे. त्यामुळेच आपण नंबर वन ठरलो. आता त्यापेक्षा तिप्पट मोठं बंदर वाढवण मध्ये होत आहे. या बंदरामुळे पुढील 50 वर्ष महाराष्ट्र नंबर वन राहील केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे हे होणार आहे. 1980 च्या दशकात वाढवण बंदर करण्याचे स्वप्न पाहिलं गेलं होतं पण 2024 मध्ये ते प्रत्यक्षात उतरत आहे. मोदी यांचे सरकार आले आणि वाढवण बंदर सुरू करण्याच्या कामाला वेग आला. कोर्टाच्या नोटिफिकेशन मधून वाढवण बंदर बाहेर आलं. नरेंद्र मोदी यांनी त्याला नॅशनल पोर्टचा दर्जा दिला. असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

तिसरं विमानतळ झालं तर महाराष्ट्र पुढे जाईल

पुढे बोलताना ते म्हणाले पुढील 200 वर्ष हे बंदर राहील आणि मोदींचं नावही राहील. भारताला पुढे नेण्याचं काम मोदींनी केलंय. हे बंदर पाहून लोक म्हणतील जगातील सर्व एअरपोर्ट रिक्लेमेशन करून तयार केले आहे. येत्या काळामध्ये मुंबई वाढणार आहे. वसई विरार मध्ये वाढणार आहे. पण आपण बंदराचा रिक्लेमेशन करणार आहोत. या ठिकाणी एअरपोर्टही रिक्लेमेशन केलं पाहिजे या ठिकाणी तिसरं विमानतळ झालं तर महाराष्ट्र अधिक पुढे जाईल अशी अपेक्षा फडणवीस आणि व्यक्त केली आहे.

एकाही व्यक्तीला वाऱ्यावर सोडणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्या दरम्यान अजित पवार यांनी येथील स्थानिक रहिवाशांना आश्वस्थ केले आहे. 76 हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी स्थानिकांकडून विरोध होत असल्याचे लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की वाढवण बंदरामुळे परिसराचा चौफेर विकास होणार आहे. मोठ्या प्रमाणावर रोजगाराची निर्मिती होणार आहे. विकासासाठी थोडी पावलं मागे घ्यावी लागणार आहेत. परंतु मी तुम्हाला आश्वासन देतो की वाढवण परिसरातील एकाही व्यक्तीला वाऱ्यावर सोडणार नाही. असे आश्वसन त्यांनी येथील स्थानिकांना दिले.