नगरमध्ये राम शिंदेच मोठा भाऊ ; विखेंची जि.प. प्रकरणी गोची

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी |  जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता प्रस्तापित करत राधा कृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पत्नी शालिनी विखे पाटील यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनवले. त्यानंतर राधाकृष्ण विखे हे भाजपमध्ये आल्या नंतर त्यांचीच संपूर्ण जिल्हयात चलती राहील असे त्यांच्या आप्तस्वकीयांना वाटणे सहाजिक आहे. मात्र एका प्रकारातून राम शिंदेच नगरमध्ये मोठा भाऊ राहील असे भाजपने दाखवून दिले आहे.

त्याचे झाले असे कि अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने त्यांच्यावर जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी अविश्वासाचा ठराव आणला. कर्मचाऱ्यांच्या रखडवलेल्या बदल्या आणि गाईरसोईच्या ठीकाणी केलेल्या बदल्या , विकास निधीचा नकेलेला वापर, माजी सैनिकाच्या पत्नीचा प्रलंबित ठेवलेला अर्ज या मुद्दयांच्या आधारे त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता. तो मंजूर देखील झाला मात्र नाशिकचे विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी हा अविश्वासाचा ठराव बेकायदेशीर असून २ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी समक्ष येऊन या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात यावे असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे विखे मंत्री असून देखील त्यांच्या पत्नीच्या अधिकार पदाला वजन दिले जात नाही हेच यातून सिद्ध होते आहे.

दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने हे पालकमंत्री राम शिंदे यांच्या जवळचे असल्याचे समजते त्यामुळे त्यांना वाचवण्याचा राम शिंदे संपूर्ण प्रयत्न करणार आहेत. राम शिंदे हेच नगरचे मोठे भाऊ आहेत हे या मुद्द्यावरून स्पष्ट होताना दिसते आहे. तर विखे पाटील यांचा काँग्रेस मधील हेका भाजप मध्ये चालणार नाही हे देखील भाजपने त्यांना दाखवून दिले आहे. विश्वजीत माने अविश्वास प्रकारात विखे मॅडमचे एकच चुकले ते म्हणजे त्यांनी विश्वजीत माने यांना सभेपुढे आपले मत मांडू दिले नाही. त्यामुळे हि कृती नैसर्गिक न्यायला धरून नाही त्यामुळे हा अविश्वास ठराव कायद्याला धरून नाही आहे विभागीय आयुक्तांनी सुनावले आहे.

Leave a Comment