अपार्टमेंटमध्ये गुपचूप सुरु होते सेक्स रॅकेट; पोलिसांनी छापा टाकून केला भांडाफोड

अकोला : हॅलो महाराष्ट्र – अकोलामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अकोला शहरातील एका इमारतीमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची टीप पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी याची खातरजमा करून त्या ठिकाणी छापा टाकला. हे सेक्स रॅकेट अकोला शहरातील मलकापूर परिसरात होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण
मलकापूर परिसरातील साई अपार्टमेंटमधील एका खोलीत सेक्स रॅकेट सुरू असल्याची टीप स्थानिक पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून सगळी खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरुन पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या अपार्टमेंटमधील घरमालक आणि त्याची पत्नी या दोघांनी दोन तरुणींना पैशांचे आमिष दाखवत हे कृत्य करण्यासाठी आणले होते.

पोलिसांनी ज्यावेळी या ठिकाणी छापा टाकला तेव्हा घटनास्थळी दोन मुली, घरमालक, एक महिला आढळून आले. तर एका ग्राहकाने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा व्यक्ती एका ग्राहकाकडून एका तासाला हजार रुपये आणि एका रात्रीसाठी 2 हजार रुपये घेत असे अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मोबाइल फोन, पैसे आणि इतर साहित्य जप्त केले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.