औरंगाबाद प्रतिनिधी | लग्नाचे आमिष दाखवून कॉलेज तरुणाने काॅलेज तरूणीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील जवखेडा येथे हा प्रकार घडला आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाल्यानंतर एका तरूणाने १७ वर्षीय तरूणीचे लैंगिक शोषण केले. अक्षय ज्ञानेश्वर इंगळे असे तरूणीचे लैंगिक शोषण करणार्या आरोपीचे नाव आहे.
पीडित तरूणी व अक्षय इंगळे हे दोघे फुलंब्री तालुक्यातील जवखेडा येथे असलेल्या शिवछत्रपती ज्युनिअर महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्यावेळी पीडित तरूणीसोबत अक्षय इंगळेची ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबधात झाल्यानंतर अक्षय इंगळे याने नोव्हेबर २०१९ ते पेâब्रुवारी २०२० या काळात विविध ठिकाणी नेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केले. पीडितेने लग्नासाठी तकादा लावल्यावर अक्षय इंगळे याने लग्न करण्यास नकार देत तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
दरम्यान, पीडित तरूणीच्या तक्रारीवरून अक्षय इंगळे याच्याविरूध्द सिडको पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक अश्लेषा पाटील करीत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’




