महिलेचे लैंगिक शोषण; दोन जणांना अटक

मूर्तिजापूर : हॅलो महाराष्ट्र – गोयंनका नगर भागात राहणाऱ्या दोन नराधमांनी एका ४५ वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केले आहे. याप्रकरणी दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींची नावे अशोक अग्रवाल व किशन अग्रवाल अशी आहेत.

या दोघां नराधमांनी या महिलेचे लैंगिक शोषण करुन तिच्याशी अनेकवेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले असल्याची तक्रार या पीडित महिलेने पोलिसांना दिली आहे. तिने आपल्या तक्रारीत हे आरोपी नराधम शारीरिक संबंध प्रस्थापित करुन लैंगिक शोषण करीत व या गोष्टीची कुठे वाच्यता केली तर जीवे मारण्याची धमकीसुद्धा देत असत.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी अशोक अग्रवाल व किशन अग्रवाल या दोघांविरुद्ध ३७६, ३७६ (२) (के) ३५४, ५०६, ३४ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटकदेखील केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक इंगळे करत आहेत.