संतापजनक ! अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवूक केले लैंगिक शोषण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई

प्रेमाच्या जाळ्यात गुंतवून शारीरिक संबाधांची अश्लिल शुटींग घेवून ते व्हायरल करण्याच्या धमकीने सतत बलात्कार केल्याची घटना अमरावती जिल्हात घडली आहे. येथील माहुली जहागीर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हि घटना घडली असून पोलिसात तक्रार दाखल करताच आरोपी फरार झाला आहे.

वासनेच्या विखाराने बाधित झाल्येल्या प्रेमजाळ्यात ओढलेल्या तरुणीला ब्लॅकमेल करत शारीरिक संबधाचा आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करून त्याआधारे पीडित तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण केल्यानंतर पीडित तरुणीच्या होणाऱ्या पतीसह नातेवाइकांच्या मोबाइलवर तो आक्षेपार्ह व्हिडीओ फोटो व्हायरल केल्याची. धक्कादायक तेवढीच संतापजनक घटना अमरावती जिल्ह्यातील माहुली जहागीर पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे .

या प्रकरणी लैंगिक शोषण करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या विवाहित आरोपी विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. सध्या तो फरार झाला आहे.

Leave a Comment