हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shah Rukh Khan Hospitalized) बॉलिवूड सिनेविश्वाचा बादशाह अर्थात लाडका अभिनेता शाहरुख खानचा चाहता वर्ग फार मोठा आहे. जो त्याच्याविषयी जाणून घेण्यात कायम रुची ठेवतो. दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगमधील शाहरुख खानच्या मालकीचा संघ कोलकाता नाईट रायडर्स यंदा प्लेऑफमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील IPL ची पहिली क्वालिफायर मॅच पाहण्यासाठी शाहरुख मंगळवारी, २१ मे रोजी अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हजर होता. दरम्यान, त्याची प्रकृती अचानक बिघडली होती. ज्यासाठी त्याला अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अभिनेत्याची तब्येत बिघडण्याचे कारण (Shah Rukh Khan Hospitalized)
आपल्या संघाला पाठिंबा दर्शवण्यासाठी शाहरुख स्टेडियमवर हजर होता. दरम्यान, मॅच जिंकल्यावर संघ आणि केकेआरच्या चाहत्यांसह शाहरुखने विजयाचा जल्लोष देखील केला. यावेळी विजयाचा आनंद साजरा करताना शाहरुखला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने सर्वप्रथम प्राथमिक उपचार घेतले. मात्र प्राथमिक उपचार घेऊनही त्याची तब्येत सुधारत नव्हती. हे लक्षात येताच त्याला तातडीने अहमदाबादमधील एका रुग्णालयात दाखल केले गेले. तिथे त्याच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.
डॉक्टरांनी शाहरुखला तपासल्यानंतर त्यांनी सांगितले की, शरीरातील पाणी अचानक कमी झाल्यामुळे अभिनेत्याची प्रकृती खालावली आहे. वाढत्या उष्णतेमुळे शाहरुख डिहायड्रेशनचा शिकार झाला आणि परिणामी त्याच्या तब्येतीवर गंभीर परिणाम झाल्याचे समजत आहे. (Shah Rukh Khan Hospitalized)माहितीनुसार, अहमदाबादमध्ये गेल्या २ दिवसांपासून उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. देशभरात अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती असल्याने बरेच लोक उष्माघातासारख्या समस्येने त्रासलेले दिसत आहेत.
जुही चावलाने दिली हेल्थ अपडेट
शाहरुखच्या प्रकृतीबद्दल त्याचे चाहते चिंतेत असताना अभिनेत्याची जवळची मैत्रीण जुही चावला त्याच्या भेटीसाठी अहमदाबादला पोहोचली होती. यानंतर तिने शाहरुखच्या तब्येतीबाबत सांगताना म्हटले की, ‘काल (बुधवार २२ मे) रात्रीपासून त्याच्या प्रकृतीत सुधारणा आहे. त्याची उत्तमप्रकारे काळजी घेतली जात आहे. (Shah Rukh Khan Hospitalized) तो लवकरच बरा होईल डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्यास सांगितलं आहे. आता आमची टीम अंतिम सामना खेळेल तेव्हा तो या वीकेंडला टीमला सपोर्ट करण्यासाठी नक्की स्टेडियममध्ये येईल’.
कधी मिळेल डिस्चार्ज?
एका वृत्तानुसार, शाहरुख खानच्या तब्येतीत बरीच सुधारणा दिसून येत आहे. शिवाय त्याची सकारात्मक बाजू पाहता आज २३ मे २०२४ रोजी अभिनेत्याला डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. (Shah Rukh Khan Hospitalized)