पंतप्रधान मोदी फॉलो करत असलेल्या महिलेला शाहिनबागमधील महिलांनी पकडले; छुप्या कॅमेऱ्यातुन व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शाहीनबागमध्ये संशयितरित्या हालचाली करणाऱ्या एका बुरखाधारी महिलेला शाहीनबागमधील महिलांनी पकडले. गुंजा कपूर असं त्या महिलेचे नाव असून तिला ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी फॉलो करत आहेत. छुप्या कॅमेऱ्याच्या मदतीने ती व्हिडीओ तयार करत असल्याचा आरोप शाहीन बागमधील महिलांनी केला. तसेच तिचे युट्युबवर व्हिडीओ चॅनेल देखील आहे.

बुरखा घातलेली ही महिला बुधवारी निषेध करणार्‍या महिलांमध्ये बसली होती आणि महिलांना काही प्रश्न विचारत होती. त्यानंतर निषेध करणार्‍या महिलांनी तिच्यावर संशय घेतला आणि तिची तपासणी करण्यात आली. या तपासणीत तिच्याजवळ एक कॅमेरा आढळला. यानंतर तिथे एकच गोंधळ उडाला. तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

शाहीनबागमधील महिलांचे म्हणणे आहे की, गुंजा कपूर नावाची महिला बुरख्यामध्ये कॅमेरा लावून व्हिडिओ बनवत होती. ती तिथे बुरखा घालून का आली होती आणि ती लपून का व्हिडिओ बनविते याचे उत्तर तिच्याकडे नव्हते. पोलिसांनी अद्याप तिच्याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर गुंजा कपूरला फॉलो करतात. खुद्द गुंजा कपूर यांनी याचा खुलासा केला आहे. गुंजा यांनी आपल्या एका ट्विटमध्ये लिहिले आहे की पीएम मोदींनी नवीन वर्षाच्या निमित्ताने मला फॉलो केले. ही माझी नवीन वर्षाची भेट आहे.

 

Leave a Comment