हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शाहीनबागमध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाने या देशामध्ये फक्त हिंदूंचेच राज्य चालणार, बाकी कोणाचे नाही असे वक्तव्य केले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. शाहिनबाग येथे आंदोलन करणारा शाहनवाज म्हणाला की, शाहीन बाग परिसरात गोळीबार करणारी व्यक्ती जयश्री रामच्या घोषणा देत होती. त्याने तीन वेळा गोळीबार केला. त्याने दिल्ली पोलिसांच्या उपस्थितीत गोळीबार केला आहे. त्याचवेळी पोलिसांच्या वतीने ताब्यात घेतल्यानंतर आरोपी तरुण म्हणाला की, भारतात फक्त हिंदूच राज्य चालणार बाकी कोणाचे नाही. आरोपीने आपले नाव कपिल असल्याचे सांगितले. तो दिल्लीतील दल्लूपुरा परिसरातील रहिवासी आहे.
#WATCH Delhi: Man who had fired bullets in Shaheen Bagh area being taken away from the spot by police. pic.twitter.com/lenDhRcWGD
— ANI (@ANI) February 1, 2020
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) विरोधात गेल्या दीड महिन्यांपासून दिल्लीतील शाहीन बाग येथे आंदोलन होत आहे. यापूर्वी दिल्लीच्या जामिया भागात नागरिक सुधारणा कायद्याच्या विरोधात मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर एका अल्पवयीन मुलीने गोळीबार केला होता. यात एक विद्यार्थी शादाब जखमी झाला. यानंतर दिल्ली पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला अटक केली.